कराडमध्ये मोठ्या रॅकेटचा भांडाफोड; तज्ज्ञ डॉक्टरांच्या बनावट सहीचा दिला जायचा रिपोर्ट
काय नेमकं प्रकरण?
उत्तरप्रदेश येथील बाराबंकी जिल्ह्यांतील कोठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दफरापूर माजरा सैदानपूर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. किडनी स्टोनच्या त्रासाने मुनीश्र रावत या त्रस्त होत्या. तेव्हा कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेले. त्याच ठिकाणी असलेल्या क्लिनिक चालक ज्ञान प्रकाश मिश्राने तपासाणीनंतर सांगितलं की, किडनी स्टोन आहे आणि तातडीने त्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे. यासाठी तब्बल २५ हजारांची मागणी बोगस डॉक्टरांनी केली होती. ऑपरेशन दरम्यान महिलेचा मृत्यू झाला.
You Tube वर बघत ऑपरेशन
महिलेच्या कुटुंबीयांनी या डॉक्टरवर गंभीर आरोप केले आहे. जेव्हा महिलेला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं त्यावेळी डॉक्टर ज्ञान प्रकाश मिश्रा हा दारूच्या नशेत होता. त्याला कुठलाच ज्ञान नव्हतं. त्याने मोबाईलवरील You Tube ओपन करून स्टोनचं ऑपरेशन कसं करावं याचा व्हिडिओ पाहिला. त्यानंतर महिलेचं ऑपरेशन करण्यास सुरुवात केली. या अर्धवट ज्ञानामुळे आणि दारूच्या नशेत असलेल्या डॉक्टरांनी महिला रुग्णाच्या नसाच कापून टाकल्या. खूप रक्तस्त्राव आणि चुकीच्या उपचारामुळे दुसऱ्याच दिवशी महिलेचा दुर्दैवी अंत झाला.
धक्कदायक माहिती समोर
मुख्य आरोपी ज्ञान प्रकाश मिश्रा याचा पुतण्या विवेक कुमार मिश्रा हा रायबरेलीतील एका आयुर्वेदिक रुग्णालयात सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.त्याच्या नावाचाच वापर करून काका- पुतण्यांनी हा कांड केला. आता पोलिसांनी रुग्णालय सील केले असून आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस फरार आरोपींचा तपास करत आहे.






