नेमकं काय घडलं?
७ डिसेंबरला संध्याकाळी संजय शर्मा आणि त्याची पत्नी निशा शर्मा यांच्यामध्ये जेवण बनवण्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की, संजयने रंगाच्या भरात निशाच्या साडीने गळा आवळून तिची हत्या केली. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी ती साडी जाळून टाकली आणि मृतदेह जवळच्या परिसरातील झुडुपांमध्ये फेकून दिला.
स्थानिकांना गंभीर अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळ्यास परिसरात एकच खळबळ उडाली आणि पोलिसांना सुद्धा या प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यानंतर, पोलिसांनी तपासासाठी पथके तयार केली आणि तपास सुरु केला. मृत महिलेचा पती संजयवर पोलिसांना संशय आला. त्यानंतर, पोलिसांनी आरोपीची कठोर चौकशी केली. चौकशीत संजयने गुन्हा कबूल केला. आरोपी संजयने सांगितलेल्या ठिकाणी पोलिसांनी जाळलेल्या साडीचे तुकडे सुद्धा ताब्यात घेतले.
गुन्हा दाखल
आरोपी संजय हा मूळचा बिहारमधील शिवण जिल्ह्याचा रहिवासी आहे. तो बऱ्याच काळापासून मुसाबनी येथे राहत होता. पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.
विवाहबाह्य प्रेमसंबंधाचा शेवट खूनी कटात; पत्नी आणि प्रियकराकडून पतीची जंगलात हत्या
झारखंड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. आधी अपहरण केलं, नंतर जंगलात नेले आणि तिथे निर्दयीपणे हत्या करण्यात आली. मृतकाचे नाव संजू भारती (35) असे आहे. ही घटना झारखंडच्या चितरा गावात २२ नोव्हेंबर रोजी घडली.
काय घडलं नेमकं?
आरोपी पत्नीचं नाव रीता कुमारी आणि तिचा प्रियकर अरविंद भारती यांनी पती संजू याचा काटा काढण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी आधी अपहरण केलं त्यानंतर त्याला जंगलात नेऊन त्याची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी मृतकाच्या भावाने म्हणजेच संजयने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संजयने मृतकाचे पत्नी रीता कुमारी आणि तिचा प्रियकर अरविंद भारती यांनी मिळून संजूची हत्या केल्याचे स्पष्ट आरोप केले. त्याने हत्येचा घटनाक्रम सांगितला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पीडित संजूचा शोध घेण्यास सुरुवात केली.
Ans: जेवण बनवण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात पतीने हत्या केली.
Ans: त्याने हत्या केलेली साडी जाळली आणि मृतदेह झुडपात फेकला.
Ans: तपासादरम्यान संशय आल्याने पोलिसांनी चौकशी केली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.






