हैदराबाद : हैदराबादमधील जुबली हिल्स (jubilee hils) परिसरात अनेक नाईट क्लब (Night Club) आहेत. येथे नेहमी वेगवेगळ्या पार्टींच आयोजन करण्यात येत. मात्र, येथील झोरा नाईट क्लबने (Xora night club) अलीकडेच वाइल्ड जंगल पार्टी (Wild Party)आयोजीत केली. या पार्टीत थेट विदेशी वन्यजीवांना समावेश करण्यात आलं. या पार्टी तील काही तरुण-तरुणांचे प्राण्यांसोबत नाचतानचे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
हैदराबाद येथील झोरा नाईट क्लबने वाइल्ड जंगल पार्टी थीमचा भाग म्हणून आपल्या परिसरात वन्यजीवांचा पार्टीत आणले. या पार्टीत सहभागी लोकांनी वन्यप्राण्यांना मिठी मारून आणि खांद्यावर ठेवून पबमध्ये डान्स केला, याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक मुलगी गळ्यात साप आणि खांद्यावर भलामोठा सरडा घेऊन नाचताना दिसत आहे. या पार्टीत दाखवण्यात आलेले सर्व वन्यजीव परदेशी असल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा या पार्टीत सहभागी असलेल्या लोकांच्या इन्स्टा स्टोरीज सोशल मीडियावर व्हायरल झाल्या त्यानंतर आता पबची चौकशी सुरू आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप आयोजकांवर गुन्हा दाखल केलेला नाही.
याशिवाय परदेशी जातीचे मांजरही पिंजऱ्यात कैद झालेले पाहायला मिळते. काही लोक अजगर सदृश सापाला हातात धरलेले दिसतात. या पार्टीची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हैदराबादमध्ये वाइल्ड जंगल पार्टीची चर्चा होत आहे. आता या प्रकरणी पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.