CRIME (फोटो सौजन्य - PINTEREST)
पोलीस दलात डीजीपी सारख्या इतक्या उच्च पदावर राहिलेल्या व्यक्तीची पत्नीनेच हत्या केल्याने खळबळ उडणं स्वाभाविक आहे. ही हत्या का केली? त्यामागची काय कारणं आहेत?. महत्त्वाच म्हणजे या जोडप्याला वयात आलेली दोन मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी. पतीची हत्या केल्यानंतर पत्नी IPS च्या फॅमिली ग्रुपवर काय म्हणाली? जाणून घ्या हायप्रोफाइल मर्डर केसचे सर्व डिटेल्स
स्वारगेट बलात्कारप्रकरणी मोठी अपडेट; विशेष सरकारी वकीलपदी अजय मिसार यांची नियुक्ती
कर्नाटकचे माजी डीजीपी ओमप्रकाश यांची हत्या दुसरं तिसरं कोणी नसून पत्नीनेच केली आहे. यांच्या हत्येने सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यांची हत्या पत्नीने केल्याचे समजताच सगळ्यांना प्रश्न पडले आहे की, त्यांच्या पतीनीने असं का केलं? त्यामागची कारण काय? पत्नीने पोलीस दलात डीजीपी सारख्या इतक्या उच्च पदावर राहिलेल्या पतीची इतकी निर्घृण हत्या का केली? डीजीपीला दोन मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी, या दोघांनी पोलीस चौकशीत माहिती दिली आहे.
माजी डीजीपी ओमप्रकाश यांची हत्या कशी झाली?
बंगळुरू पोलिसांनुसार, शनिवारी माजी डीजीपी ओमप्रकाश आणि त्यांची पत्नी पल्लवी दोघांमध्ये भांडण झालं होतं. भांडणांनंतर ओमप्रकाश आपल्या कारमध्ये बसले व बहिणीच्या घरी निघून गेले. त्यांची बहीण एका खासगी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. त्यांचं घटस्फोट झाला आहे. रविवारी दुपारी त्यांची मुलगी बहिणीच्या घरी आली. ओमप्रकाश यांना समाजवले आणि पुन्हा आपल्या घरी घेऊन आली. घरी आल्यानंतर नवरा-बायकोमध्ये पुन्हा भांडण झालं.
त्यावेळी ओमप्रकाश यांच्यावर पल्लवीने ८ ते १० वेळा चाकू भोसकला. पल्लवीने ओमप्रकाश यांच्या छातीवर, पोटावर आणि हातावर वार केले. या हल्ल्यानंतर ओमप्रकाश घरातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. ते जवळपास २० मिनिट जमिनीवर तडफडत होते. पत्नी पल्लवी आणि मुलगी यांनी ओमप्रकाश यांना तडफडून प्राण सोडताना पाहिलं. ओमप्रकाश यांचं तडफडण थांबल्यानंतर पालवीने दुसऱ्या माजी डीजीपीच्या पत्नीला व्हिडीओ कॉल करून ‘मॉन्स्टरला कायमस्वरुपी संपवून टाकलं’ असं सांगितलं. त्यानंतर पल्लवीने एचएसआर लेआऊट पोलीस स्टेशनला फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी आले आणि पत्नी आणि मुलीला ताब्यात घेतलं. चौकशीनंतर रविवारी दोघींना अटक केली.
आयपीएसच्या फॅमिली व्हॉट्स App ग्रुपमध्ये उत्तर..
माजी डीजीपी ओमप्रकाश हे मूळचे बिहार चंपारणचे. त्यांनी बंगळुरूमध्ये भरपूर संपत्ती बनवलेली. डीजीपी असतांना त्यांनी काली नदीच्या किनाऱ्यावर तीन एकारपेक्षा अधिक जमीन खरेदी करून भव्य फार्म हाऊस बनवलं होत. त्याशिवाय बरीच संपत्ती त्यांनी पत्नी आणि मुलीच्या नावावर केली होती. तरी देखील त्यांच्या पत्नीने त्यांची हत्या का केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रश्नाचं उत्तर पल्लवीने आयपीएसच्या फॅमिली व्हॉट्स App ग्रुपमध्ये दिलं आहे. “पती मला आणि माझ्या मुलीला अपमानित करत आहेत. ते अनेकदा आमच्यावर बंदूक रोखतात व गोळी मारण्याची धमकी देतात” असं मेसेजमध्ये लिहिलं होतं.
हत्येचं आणखी एक कारण काय?
या हत्येमागे अजून एक कारण सांगितलं जात आहे. ते म्हणजे डीजीपीच्या संपत्तीशी जुडून आहे. माजी डीजीपी ओमप्रकाश यांचं दंडेली येथे एक फार्म होत. ते फार्म त्यांनी त्यांच्या बहिणीच्या नावावर केलं होत. त्यानंतर घरात वादावादी सुरु झाली. त्याशिवाय ओमप्रकाश यांच्याकडे बंगळुरुत दोन घरं आहेत. एक फ्लॅट कावेरी जंक्शनवरील प्रेस्टीज अपार्टमेंटमध्ये आहे, जिथे त्यांची हत्या झाली.
डीजीपीच्या मुलाने केले धक्कादायक आरोप…
माजी डीजीपीचा मुलगा कार्तिकेशने पोलिसांसमोर वेगळं स्टेटमेंट दिल आहे. त्यांने पल्लवी आणि त्याची बहीण कृती विरोधात तक्रार दिली आहे. गेल्या आठवड्याभरापासून पल्लवीने ओमप्रकाशचा छळ चालवला होता. त्यांना जीवेमारण्याची धमकी पल्लवी देत होती. म्हणून ओमप्रकाश हे घर सोडून त्यांच्या बहीण सरिताच्या घरी निघून गेले होते. त्यानंतर ओमप्रकाशची मुलगी कृती तिथे गेली आणि त्यांची समजून घालून त्यांना घरी परत घेऊन आली.
हत्येच्या वेळेस कार्तिकेश कुठे होता?
कार्तिकेशनुसार, तो हत्येच्या वेळेस (20 एप्रिल) ला संध्याकाळी डोम्लुर येथील कर्नाटक गोल्फ असोसिएशनच्या मैदानावर गेला होता. त्याच दरम्यान वडिलांची हत्या झाली. कार्तिकेशने सांगितलं की, शेजाऱ्यांचा फोन आल्यानंतर तो घरी निघून आला. घरी आल्यावर पाहिलं की, पोलीस आणि अन्य लोक जमलेले. वडिलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला. मृतदेहाजवळ एक तुटलेली बॉटल आणि चाकू होता.
अनैतिक संबंध, हाय प्रोफाइल पार्ट्या
नवऱ्याचे अनेक महिला आणि मुलींसोबत अनैतिक संबंध असल्याच तिने सांगितलं होतं. पल्लवीने अनेकदा यावरुन नवऱ्याला टोकलं होतं. स्वत: पल्लवीने व्हॉट्सअप चॅटमध्ये ही गोष्ट स्वीकारली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, माजी डीजीपी ओमप्रकाश हे अय्याशी करणारं व्यक्तीमत्व होतं. घरी पत्नी बरोबर भांडण व्हायची म्हणून ते आपला बराचसा वेळ फार्म हाऊसवर घालवायचे. असं म्हटलं जातं की, या फार्म हाऊसवर हाय प्रोफाइल पार्ट्या चालायच्या. सभ्य समाजात वर्जित असलेल्या गोष्टी या पार्ट्यांमध्ये चालायच्या.
पल्लवीचा दावा काय ?
मारेकरी पत्नी पल्लवीचा दावा आहे की, तिने स्वसंरक्षणासाठी ही हत्या केली. पोलिसांना दिलेल्या जबानीत पल्लवीने सांगितलं की, नवऱ्याने आपल्यावर बंदूक रोखली होती. ते गोळी चालवणार होते. म्हणून त्यांना बॉटल फेकून मारली. जेव्हा ते खाली पडले, तेव्हा चाकूचे सपासप वार करुन हत्या केली.
पुण्यात जमिनीच्या वादातून तरुणाचा खून; प्रसार झालेल्या आरोपींना सापळा रचून पकडले