Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरातून महिलेचे दागिने चोरीला; भरदिवसा घडला प्रकार

तक्रारदार ६३ वर्षीय ज्येष्ठ महिला मध्य प्रदेशातील इंदूरच्या रहिवासी आहेत. त्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात दर्शनासाठी आल्या होत्या. मंदिराच्या परिसरात गर्दी झाली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 30, 2026 | 02:27 PM
श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरातून महिलेचे दागिने चोरीला; भरदिवसा घडला प्रकार

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरातून महिलेचे दागिने चोरीला; भरदिवसा घडला प्रकार

Follow Us
Follow Us:

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात एका ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून रोकड, सोनसाखळी असा ८३ हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६३ वर्षीय ज्येष्ठ महिला मध्य प्रदेशातील इंदूरच्या रहिवासी आहेत. त्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात दर्शनासाठी आल्या होत्या. मंदिराच्या परिसरात गर्दी झाली होती. चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून तीन हजारांची रोकड आणि सोनसाखळी असा ८३ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना नुकतीच घडली.

पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस हवालदार गोंजारी तपास करत आहेत. मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, तसेच रविवार पेठेत खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या पिशवीतून दागिने, रोकड चोरुन नेण्याच्या घटना नुकत्याच घडल्या.

वारी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ

काही दिवसांपूर्वीच, श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात यंदाही चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दर्शनासाठी आलेल्या महिला व पुरूष भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषत: वारकऱ्यांच्या बंदोबस्तासाठी कडेकोट पोलिस तैनात असताना देखील या चोऱ्या झाल्या आहेत. पोलिसांकडून साध्या गणवेशातील पोलिस व इतर पथके असतानाही या चोऱ्या घडल्या आहेत. एकूण ११ घटना घडल्या असून, त्यापैकी ९ घटना एकट्या हडपसर परिसरात नोंदविण्यात आल्या आहेत.

घरफोड्यांसोबतच उघड्या दरवाजांमधूनही चोऱ्या 

आणखी एका घटनेत, पुणे शहरात घरफोड्यांचे सत्र सुरू असतानाच चोरटे आता उघड्या दरावाजातून आत शिरत घरातून किंमती ऐवज चोरू लागले आहेत. चतु:शृंगी, वाघोली आणि कोंढव्यात प्रत्येकी एका ठिकाणी घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्यांनी सुमारे पाच लाख रुपये किमतीचे दागिने, लॅपटॉप व मोबाइल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील नागरिक झोपेत असताना, तसेच घरातील वृद्ध महिला एकटी असताना चोरट्यांनी ही कृत्ये केली आहेत.

चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’, 31 ऑगस्टची डेडलाइन; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Web Title: Woman jewelry stolen from the shrimant dagdusheth halwai temple premises

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Theft Case

संबंधित बातम्या

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, लासूर स्टेशनमध्ये थरार; नेमकं काय घडलं?
1

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, लासूर स्टेशनमध्ये थरार; नेमकं काय घडलं?

अण्णासाहेब पाटील महामंडळाची फसवणूक, तब्बल दहा लाखांना घातला गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल
2

अण्णासाहेब पाटील महामंडळाची फसवणूक, तब्बल दहा लाखांना घातला गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल

सोशल मिडिया इन्फ्लुएंसरसोबत घडलं भयंकर! गाडीतून अपहरण, झाडाला बांधलं अन् जिवंत जाळलं; हत्येमागे लिव्ह-इनचे कनेक्शन?
3

सोशल मिडिया इन्फ्लुएंसरसोबत घडलं भयंकर! गाडीतून अपहरण, झाडाला बांधलं अन् जिवंत जाळलं; हत्येमागे लिव्ह-इनचे कनेक्शन?

व्हेल माशाची ‘उलटी’ घेऊन जात होते चौघे; तस्करीचा पर्दाफाश, २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

व्हेल माशाची ‘उलटी’ घेऊन जात होते चौघे; तस्करीचा पर्दाफाश, २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.