यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, उरण पोलिसांचा धक्कादायक खुलासा! (फोटो सौजन्य-ट्विटर)
महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या यशश्री हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील यशश्री शिंदे या 20 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख हा यशश्रीची हत्या करून कर्नाटकात पळून होता. अखेर नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकात जाऊन आरोपीला अटक केली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला. त्यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
२० वर्षीय यशश्री शिंदे हिच्या निर्घृण हत्येने संपूर्ण मुंबई हादरली आहे. गुरुवारी ती बेपत्ता झाली होती, त्यानंतर शुक्रवारी रात्री उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळील निर्जन रस्त्यावर तिचा मृतदेह आढळून आला. यशश्रीचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला होता. तिच्या कमरेवर व पाठीवर चाकूने अनेक वार केल्याच्या खुणा होत्या. तसेच तिच्या गुप्तांगावर जखमा झाल्या होत्या.
हे सुद्धा वाचा: उरण हत्याकांड प्रकरण, आरोपी दाऊद शेखला अटक; सीसीटीव्ही फुटेजही समोर
आज (30 जुलै) सकाळी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याचे ठिकाण सापडत नसल्याने त्याला अटक करण्यास वेळ लागला. अखेर त्याच्या ओळखीच्या व्यक्तीने दाऊदबद्दल माहिती दिली. आम्ही त्याला कर्नाटकातून ताब्यात घेतले आहे. दाऊद शेख आणि हत्या झालेल्या तरुणीमध्ये मैत्री होती. दोघेही एकमेकांना ओळखत होते. दोघांमध्ये वाद झाला असून यातूनच हत्या झाल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दाऊद आणि यशश्री यांच्यात मैत्री होती, मात्र दोन ते तीन वर्षांपासून त्यांच्यात कोणताही संपर्क झाला नाही. हा अपहरणाचा प्रकार नसून दोघांनी एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतला, मात्र यामागे हत्येचा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. आरोपीनं ठरवून हत्या केल्याचं देखील तपासात समोर आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उरण पोलिसांनी कर्नाटकातून मोहसीन नावाच्या आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलीस दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन हा यशश्री शिंदेच्याही संपर्कात होता, त्यामुळे दाऊद शेख आणि यशश्री शिंदे यांच्यात वारंवार भांडणे होत होती. 25 जुलै रोजीही दाऊद शेख आणि यशश्री यांच्यात याच मुद्द्यावरून भांडण झाल्याचा पोलिसांना संशय आहे. उरण पोलिसांचे पथकही मोहसीनची चौकशी करत आहे.
हे सुद्धा वाचा: उरणमध्ये लव जिहाद? २२ वर्षीय तरुणीची क्रूर हत्या; अवयव कापून, चेहरा आणि गुप्तांगावर जखमा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता यशश्री मित्राला भेटण्यासाठी घरातून निघाली होती. ती दुपारी २ वाजताच्या सुमारास तिच्या मैत्रिणीच्या घरातून निघाली होती आणि उरण शहर ते उरण स्थानक या मार्गावर दुपारी २:१४ वाजता सीसीटीव्हीमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. ती तिच्या मोबाईलवरून कोणाला तरी कॉल करत असल्याचेही सीसीटीव्हीत उघड झाले आहे. यशश्री आल्यानंतर सुमारे 8 मिनिटांनी दाऊद शेखही त्याच ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये दिसत होता.