मुलाचा वृध्द वडिलांवर जीवघेणा हल्ला (फोटो- istockphoto)
पैसे देण्यास नकार दिल्याने जबर मारहाण
दिवसभरात भीक मागून जमा झालेले पैसे
क्रूर कृत्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त
रत्नागिरी: रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका ७६ वर्षीय वृद्ध पित्याला, स्वतःच्या सावत्र मुलाने पैशांच्या वादातून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात वृद्ध पिता जखमी झाला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गंगाराम गनू घोडेकर (वय ७६) हे मूळचे लांजा तालुक्यातील पणोरे गावचे असून, सध्या रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात.
शुक्रवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास ते रेल्वे स्थानक परिसरात बसून दिवसभरात भीक मागून जमा झालेले पैसे मोजत होते. यावेळी त्यांचा सावत्र मुलगा अर्जुन भिवा पवार (वय ३८) याने त्यांच्याकडे खर्वांसाठी पैशांची मागणी केली. मात्र, गंगाराम यानी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. या नकाराचा राग मनात धरून अर्जुनने त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
क्रूर कृत्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त
वाद वाढल्यानंतर आरोपी अर्जुनने जवळ असलेला लाकडी दांडका उचलला व वडिलाच्या उजव्या हाताच्या बोटांवर जोरात प्रहार केला. या हल्ल्यात गंगाराम हे गंभीर जखमी झाले. प्रकरणी गंगाराम घोडेकरांनी दिलेल्या तक्रारीवरून पॉलिरांनी आरोपी अर्जुन पवारविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ व्या कलम ११८/१), ११५८२), ३५२ आणि ३५१८२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पोलिस या प्रकरणचा अधिक त्यास करत असून, रक्ताच्या नात्यातील या द्वार कृत्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे






