(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठी 6मध्ये गौतमी पाटील दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली होती. या शोची ऑफर गौतमी पाटीलला मिळाली होती. मात्र गौतमीने यावर स्पष्टीकरण देत बिग बॉस मराठीची ऑफर नाकारल्याचे आणि शोमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये गौतमी पाटील दिसणार नाही परंतू एका लावणी डान्सरली बिग बॉस मराठी 6 मध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे. बिग बॉस मराठी ६ साठी लावणी डान्सर सायली पाटीलला ऑफर मिळाली आहे.
प्रियांकाने निकला खाऊ घातला ‘भयानक वासाचा’ भारतीय पदार्थ, कपिल शर्मा शो मध्ये देसी गर्लने केला भन्नाट खुलासा; Video Viral
सायली पाटीलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये सायली म्हणताना दिसते की, तिला ‘बिग बॉस मराठी’च्या टीमकडून मेल आला आहे. “दोन दिवसांपूर्वी मला बिग बॉस मराठीकडून मेल आलाय. तुम्ही शोसाठी इंटरेस्टेड आहात का, असा मेल आहे. आता मी काय करू? मला बिग बॉसमध्ये जायला हवं का नाही? तुम्हाला काय वाटतं, ते कमेंटमध्ये सांगा,” असं ती व्हिडीओमध्ये म्हणते.
सायलीचा हा व्हिडीओ तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर नसून एका फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ नेमका कधी आणि कोणत्या संदर्भात शूट करण्यात आला, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. सायलीच्या मेन अकाऊंटवर हा व्हिडीओ दिसत नसल्याने तिला खरंच ‘बिग बॉस मराठी’च्या टीमकडून अधिकृतरित्या विचारणा झाली आहे का, यावर चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
दरम्यान, सायली पाटील बिग बॉस मराठीच्या आगामी सीझनमध्ये सहभागी होणार का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र व्हायरल व्हिडीओमुळे तिच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता सायली किंवा बिग बॉस मराठीच्या टीमकडून यावर स्पष्टीकरण येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






