प्रतिकात्मक फोटो
मुंबई : इयत्ता १० वी ची परीक्षा उद्यापासून सुरू हाेणार असून १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या दरम्यान ही परीक्षा हाेणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. या परीक्षेची पूर्ण तयारी झाली असल्याची माहिती शिक्षण विभागाने जाहिर केली आहे. मुंबई महानगर पालिकेचे १९ हजार ९५९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आाहे. १० वी ची लेखी परीक्षा ही १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या दरम्यान होईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा आधी नियोजित वेळेनुसार ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे राज्य माध्यमिक आणि मंडळाने जाहिर केले हाेते. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र असणार आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेतच त्यांना परीक्षा द्यायची आहे. यंदा परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ दिल्यामुळे परीक्षा ११ ऐवजी १० वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल.
[read_also content=”भोळ्या भक्तांनी नवस म्हणून आधी केली १ कोटी रुपयांची चोरी, नंतर खातू शाम मंदिरात दिलं १ लाख रुपयांचं दान https://www.navarashtra.com/viral/viral-news-robbers-stole-1-crore-in-and-donated-one-lakh-in-temple-matter-in-delhi-nrvb-254671.html”]
त्याआधी दहा मिनिटे म्हणजे १०.२० वाजता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव परीक्षा देता येणार नाही त्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत पुन्हा परीक्षा देता येईल, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
यंदा दहावीची परीक्षा १५ मार्च २०२२ पासून सुरू होणार आहे आणि ४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त १५ मिनिटे आणि ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त ३० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लसीकरणाचे बंधन नसले तरी आम्ही विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी पुरेसा अवधी दिला आहे.
[read_also content=”अधिक’लैंगिक संबंधां’मुळे महिलेवर पतीचा जीव घेतल्याचा आरोप, महिलेवर जमावाने केला हल्ला https://www.navarashtra.com/crime/woman-accused-of-killing-her-husband-from-overdose-of-s-e-x-know-the-details-in-marathi-nrvb-254846.html”]