विद्यार्थिनींनी अबला न राहता आत्मविश्वासाने सबल बनावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख जयंती समारोप कार्यक्रमात त्यांनी शिस्त, सद्वर्तन, आत्मसंरक्षण आणि शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज, गुरुवारपासून ऐतिहासिक सातारा शहरात सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या संमेलनात राज्यभरातून साहित्यप्रेमी, लेखक, कवी व अभ्यासक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
कधीकाळी इंजिनिअर किंवा डॉक्टर होणं हेच यशाचं प्रतीक मानलं जायचं, मात्र २०२६ मध्ये ही मानसिकता बदलताना दिसत आहे. आजचा विद्यार्थी पारंपरिक डिग्र्यांपेक्षा कौशल्य, प्रॅक्टिकल अनुभव आणि जॉब-रेडी कोर्सेसना अधिक प्राधान्य देत.
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (RRB) मध्ये मिनिस्टीरियल व आयसोलेटेड कॅटेगरी भरती २०२६साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती जाहिरात २० डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आली असून ३० डिसेंबर २०२५ पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले
अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
महिला उद्योग मंडळ, रसायनी संचलित प्राथमिक शाळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शाळा वाचविण्यासाठी पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी व सामाजिक संस्था एकवटल्या आहेत.
महाराष्ट्रात चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३ डिसेंबरपासून राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर सुरू झाली आहे.
महाराष्ट्रात शिक्षक भरती, पदस्थापना, बदली व बौद्धिक चाचण्या आता राज्य परीक्षा परिषदेमार्फत होणार आहेत. पवित्र पोर्टलमधील तांत्रिक अडचणी व विलंब लक्षात घेऊन शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सिल्लोड तालुक्यातील भवन येथील सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये २०००–२००१ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा २४ वर्षांनंतर भावनिक स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.
देवगिरी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी यासाठी इयत्ता बारावी विज्ञान वर्गाच्या पूर्वपरीक्षेला २९ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे.
बीएचएमएस (बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी) हा ५.५ वर्षांचा वैद्यकीय पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे. या कोर्समध्ये होमिओपॅथीवर आधारित नैसर्गिक उपचारपद्धतीचे सखोल ज्ञान आणि एक वर्षाची अनिवार्य इंटर्नशिप दिली जाते.