मुंबई : दोन वर्षांपूर्वी सोलापुरातल्या (Solapur) रणजीतसिंह डिसले (RanjitSingh Disley) गुरुजींची जोरदार चर्चा झाली. कारणही तसं होतं. जागतिक स्तरावर अत्यंत मानाचा मानला गेलेला ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी (Global Teacher Awards) त्यांची निवड झाली आणि अवघ्या भारताला (India) आनंद झाला. कारण, असा पुरस्कार मिळवणारा हा ‘मऱ्हाटी मातीतला फुनसुख वांगडू‘ देशातला पहिला शिक्षक ठरला. (He became the first teacher in the country).
गुरुजींना संशोधनासाठी अमेरिकेत बोलावणं आलं. पण आता नव्याचे नऊ दिवस सरले आहेत. अमेरिकेमध्ये जवळपास ४ महिने संशोधन करून महाराष्ट्रासाठी म्हणून बनवलेला शेक्षणिक आराखडा आणि शिक्षणात करायच्या बदलांचा गुरुजींनी दिलेला प्रस्ताव डिसले गुरुजी अमेरिकेतून येऊन चार महिने होऊनही धूळ खात पडून आहे. विशेष बाब अशी की, आता नवं शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या तोंडवर या प्रस्तावाचा विसर शैक्षणिक खात्याला पडलेला दिसतो आहे. डिसले गुरुजींनी आपण हा अहवाल चार महिन्यांपूर्वी दिल्याचं एका मुलाखतीत सांगितलं.
[read_also content=”बिल्किस बानो प्रकरण: SC म्हणतं ‘सफरचंदाची संत्र्याशी तुलना होऊ शकत नाही’, गुन्हा होता ‘भयानक’; 2 मे ला होणार आहे अंतिम सुनावणी https://www.navarashtra.com/india/bilkis-bano-case-update-supreme-court-observed-that-the-crime-was-horrendous-final-hearing-as-on-2nd-may-23-nrvb-386995.html”]
काही दिवसांपूर्वी रणजीत डिसले गुरुजींनी मित्रम्हणे या यू ट्यूब चॅनलला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिलेल्या अहवालाची बाब उघड केली. डिसले सध्या अमेरिकेत पीस ऐंड एज्युकेशन म्हणजेच शांतता आणि शिक्षण या विषयावर संशोधन करत आहेत. गेल्या वर्षी ते चार महिने अमेरिकेतही जाऊन आले. गेल्या डिसेंबरमध्ये ते परतले. या अमेरिकेच्या दौऱ्यात गुरुजींनी अनेक शाळांना भेटी दिल्या.. अनेक मुलांशी सवाद साधला.. अनेक शिक्षकांशी ते बोलले.. त्याच्या वैचारित देवघेवीतून आपण महाराष्ट्रातल्या मुलांसाठी शिक्षणात काय गोष्टी घेऊ शकतो याचा एक अहवाल त्यांनी तयार केला.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 18 April 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-18-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
गेल्या डिसेंबरला अमेरिकेतून आल्या आल्या त्यांनी शिक्षण सचिवांना गाठलं. याबद्दल या व्हिडिओमध्ये बोलताना ते म्हणातात. डिसेंबरमध्ये मी अमेरिकेतून आलो आणि दुसऱ्याच दिवशी मी शिक्षण सचिव आणि शिक्षण आयुक्त यांना भेटलो. त्यांना मी एक अहवाल दिला. आपल्या राज्यासाठी शिक्षणात आपण काय बदल करू शतो.. काय गोष्टी घेऊ शकतो असा तो आहे. पण अहवाल देणं माझं काम आहे. पुढे त्याचं काय होतं यावर माझा कंट्रोल नाही.
‘मित्रम्हणे’ या चॅनलशी बोलताना डिसले गुरुजींनी अनेक अनुभवांना वाट करून दिली आहे. आपलं पीस एंड एज्युकेशन हे संशोधनाचं मॉडेल जागतिक स्तरावर कसं वापरता येईल.. सर्व देशांना त्याचा कसा फायदा होईल याबद्दलही ते बोलले आहेत. त्यासाठी त्यांनी इस्रायलच्या मॉडेलचं उदाहरण घेऊन माहिती दिली आहे. या मुलाखतीत एकूण लॉकडाऊननंतरची मुलांची मानसिकता.. शिक्षकांची मानसिकता.. यावरही डिसले गुरुजींनी आपलं मत मांडलं आहे.
‘मित्रम्हणे’ या युट्यूब चॅनलवरील रणजितसिंह डिसले गुरुजींचे एपिसोड्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.