बांगलादेशी घुसखोरांविरोधात CM देवेंद्र फडणवीसांनी उघडली मोहीम; सैफवरील हल्ल्यानंतर मोठा निर्णय
नागपूर : विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तेव्हापासून भाजपने आपली आघाडी कायम ठेवली आहे. सध्या समोर येत असलेल्या कलांनुसार, भाजप आणि महायुती ही आघाडीवर आहे. मीडिया रिपोर्टनुसार महायुती ही तब्बल 217 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आता भाजप हा विजयाकडे आगेकूच करत आहे. सध्याच्या कलांनुसार महाविकास आघाडीकडे ही मोठ्या फरकाने मागे आहे. त्यामुळे आता राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन करणार असल्याची चिन्हे आहेत.
राज्यामध्ये महायुतीचे सरकार होते. आता पुन्हा एकदा लढतीनंतर सकाळपासून अनेक जागांवर महायुती आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भाजप 127 जागांवर आघाडीवर आहे. तर शिंदे गटाची शिवसेना ही 53 जागांवर आघाडीवर आहे. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी 34 जागांवर आघाडीवर आहे. त्याचबरोबर आता महाविकास आघाडीची पिछाडी झाली असल्याचे सध्या तरी चित्र आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाची केवळ 21 तर कॉंग्रेसची फक्त 19 जागांवर आघाडी आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तर 14 जागांवर आघाडी मिळवली आहे. यामुळे राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. तर भाजपकडे सर्वांत जास्त बहुमत असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. आता मात्र मिळत असलेल्या आकडेवारीनुसार भाजप पक्षाला सर्वांत जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजप पक्ष राज्यामध्ये व महायुतीमध्ये मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद असे जरी समीकरण असेल तरी देखील भाजप पक्षाकडे सर्वांत जास्त जागा आल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत अशी भाजप नेत्यांची व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व राज्यातील भाजप नेत्यांसह केंद्रातील नेत्यांना देखील मान्य आहे. त्याचबरोबर संघाला देखील देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मान्य आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची मोठी शक्यता आहे. सागर बंगल्यावर नेत्यांची मोठी गर्दी होत असून फडणवीस शुभेच्छा स्वीकारत आहेत. त्याचबरोबर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी ही देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर होत आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
नागपूरमध्ये विजयी गुलाल फडणवीसांचा
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली सुरुवातीपासून आघाडी कायम ठेवली आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. देवेंद्र फडणवीस हे आता दक्षिण पश्चिम मतदारसंघामधून विजयी झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना 35,755 मत पडली आहेत. तर त्यांच्यासमोर असणाऱ्या कॉंग्रेस उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांना 23, 426 मतं पडली आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा तब्बल 12 हजारांहून अधिक मतांनी विजय झाला आहे.