जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असून पुलवामा आणि उरी मतदारसंघाची सर्वत्र चर्चा आहे. (फोटो - टीम नवराष्ट्र)
jammu-Kashmir Election Results 2024: जम्मू काश्मीर : जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. 90 जागांवर तीन टप्प्यामध्ये विधानसभा निवडणूका पार पडल्या. 370 कलम रद्द केल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. सकाळी 8 पासून मतमोजणी सुरु झाली असून नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने जोरदार मुसंडी मारली. यामुळे राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजप व कॉंग्रेस पक्षामध्ये नाराजी पसरली होती. त्यानंतर आता निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. काश्मीरमधील पुलवामा आणि उरी या मतदारसंघातील आकडेवारी समोर येत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जम्मू व काश्मीर या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जात आहे. सध्या मतमोजणी सुरु असून पुलवामा मतदारसंघातील आकडेवारी समोर आली आहे. 12 पैकी 11 मतमोजणीच्या फेऱ्या पडल्या असून एकच फेरीची मोजणी बाकी आहे. वहीद उर रहमान पारा हे सध्या पुलवामामध्ये आघाडीवर आहेत. वहीद उर रहमान पारा हे जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार असून सध्या त्यांना चोवीस हजारहून अधिक मतं पडली आहेत. त्यानंतर दुसऱ्या जागेवर नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार मोहम्मद खलील बँड आहेत. त्यांना 12 हजारहून अधिक मतं पडली आहेत. मात्र या दोन्ही उमेदवारांमध्ये 8 हजारहून अधिक मतं पडली आहेत. त्याचबरोबर पुलवामा मतदारसंघामध्ये 1085 मतं ही नोटाला पडली आहेत.
हे देखील वाचा : J&K Election Results 2024 LIVE : जम्मू-काश्मीरमध्ये पहिला विजयी उमेदवार जाहीर; पाहा निवडणुकीचे सर्व अपडेट एका क्लिकवर
उरी विधानसभा मतदारसंघामध्ये देखील चुरशीची लढत सुरु आहे. उरीमध्ये नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उमेदवार सज्जाद शफी हे आघाडीवर आहेत. जवळपास 39 हजार मते त्यांना पडली असून मतमोजणीच्या सर्व फेऱ्या पार पडल्या आहेत. तज मोहि उद दिन या अपक्ष उमेदवारांनी उरीमध्ये टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र सज्जाद शफी हे 14 हजारांपेक्षा जास्त मतांनी पुढे आहेत. आता मतमोजणीच्या फेऱ्या देखील संपल्यामुळे सज्जाद शफी हेच उरी विधानसभा मतदारसंघामध्ये विजयाच्या मार्गावर आहेत.