(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल सध्या अनेक मुलाखती आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, यामध्ये तो आपल्या कुटुंबातील किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करत आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत बॉबीने त्याच्या वडिलांबद्दल दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांच्याबाबत एक खास आणि थोडीशी धक्कादायक आठवण सांगितली.
बॉबी देओलने राज शमानीच्या पॉडकास्टवर आपल्या बालपणीचा एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, “माझे वडील धर्मेंद्र नेहमी लोकांना खास वाटवून देत. ते भेटलेल्या प्रत्येकाशी खूप प्रेमाने बोलत असे. पण कधी कधी चाहते इतके उत्साही व्हायचे की काहीतरी चुकीचे बोलायचे किंवा गैरवर्तन करायचे. अशावेळी बाबांनी त्यांना कधी मारही दिला.”
त्याने पुढे सांगितलं, एकदा एका चाहत्याने काहीतरी बोलून धर्मेंद्रला दुखावले. धर्मेंद्र यांनी त्याला बेदम मारले. तो चाहता त्यांच्या पायाशी पडून रडू लागला आणि म्हणाला, “साहेब, मला माफ करा, मी तुम्हाला खूप प्रेम करतो.” तेव्हा धर्मेंद्रला आपल्या कृतीची जाणीव झाली. धर्मेंद्रने लगेच त्या चाहत्याला घरी आणले. त्याला दूध पाजले, जेवण दिले, अगदी कपडेही भेट दिले. बॉबी म्हणाला, “तो असाच आहे. कठोर दिसतो पण आतून खूप मऊ मनाचा आहे. शब्दांनी नाही तर कृतीतून तो आपली माया दाखवतो.”
धक्कादायक! अभिनेत्रीच्या दोन लेकरांचा गुदमरून मृत्यू; शॉर्ट सर्किटमुळे गेला जीव
बॉलीवूडमध्ये देओल कुटुंबाला प्रेक्षकांनी नेहमीच प्रचंड प्रेम दिले आहे. खास करून जेव्हा सनी देओल आणि बॉबी देओल आपल्या वडिलांबद्दल धर्मेंद्र यांच्या आठवणी आणि अनुभव शेअर करतात, तेव्हा केवळ चाहतेच नाही तर सगळेच भावूक होतात.
राणी मुखर्जी आणि काजोल का झाल्या भावुक, दुर्गा पूजा करताना काय घडलं?
धर्मेंद्र हे त्यांच्या काळातील बॉलीवूडचे सर्वात मोठे आणि प्रभावशाली स्टार मानले जातात. त्यांची लोकप्रियता एवढी होती की, चाहत्यांना त्यांची एक झलक पाहण्यासाठी अतिशय उत्सुकता असायची. त्यांच्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने अनेकांच्या हृदयावर ठसा उमटवला आहे.
बॉबी देओलचे दोन नवीन चित्रपटं, ‘आल्फा’ आणि ‘बंदर’, लवकरच रिलीज होणार आहेत. याशिवाय ते थलपती विजय यांच्या आगामी चित्रपटातही दिसणार आहेत, जो 2026 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.