Punjab Jammu Kashmir Rajya Sabha Election 2025: भारतीय निवडणूक आयोगाने बुधवारी जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील राज्यसभा जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. आयोगाच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील ४ आणि पंजाबमधील १ अशा एकूण ५ राज्यसभा जागांसाठी २४ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.
#UPDATE | चुनाव आयोग ने पंजाब और जम्मू-कश्मीर में राज्यसभा की कुल 5 सीटों के लिए उपचुनाव की घोषणा की है। इसमें पंजाब की एक और जम्मू-कश्मीर की चार सीटें शामिल हैं। इन सभी सीटों के लिए मतदान और मतगणना एक ही दिन, 24 अक्टूबर को होगी। प्रक्रिया 6 अक्टूबर से शुरू होगी। कॉपीराइट-फ्री… pic.twitter.com/7FQosYu7Jn — PB-SHABD (@PBSHABD) September 24, 2025
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, जम्मू-काश्मीरमधील चार आणि पंजाबमधील एका राज्यसभा जागेसाठीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
Leh Protest: लेहमध्ये हिंसाचार! ‘या’ मागणीसाठी भाजप ऑफिस पेटवले अन्…; नेमके प्रकरण काय?
जम्मू-काश्मीरमधील राज्यसभा जागा गेल्या सुमारे ४ वर्षांपासून रिक्त आहेत. गुलाम नबी आझाद, शमशेर सिंग मन्हास, नझीर अहमद लावे आणि फयाज अहमद मीर या चार राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२१ मध्ये संपला होता. जम्मू-काश्मीर ऑक्टोबर २०२४ पर्यंत राष्ट्रपती राजवटीखाली असल्यामुळे या जागांसाठी निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. आता केंद्रशासित प्रदेशात विधानसभा कार्यरत असल्याने निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले. केंद्रशासित प्रदेश म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये राज्यसभा निवडणुका होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पंजाबमधील राज्यसभेची जागा खासदार संदीप अरोरा यांच्या राजीनाम्यानंतर जुलैमध्ये रिक्त झाली होती. अरोरा यांनी आता पंजाब सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांनी लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या तिकिटावर पोटनिवडणूक जिंकली होती.