Photo Credit- Social Media
अकोला : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराचा धुराळा उडाला असून अवघा एक आठवडा प्रचारासाठी राहिला आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे 23 नोव्हेंबर नंतर राज्यामध्ये महायुती सरकार पुढे राहणार की महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे दिल्लीतील नेते राज्यामध्ये प्रचारासाठी दाखल झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे प्रचारासाठी धडाकेबाज सभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोल्यामध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर आणि खास करुन कॉंग्रेसवर जातीपातीचं राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
एक आहे तर सेफ आहे
राज्यामध्ये कॉंग्रेस शिवसेना ठाकरे गट व शरद पवार गट यांची युती तयारी झाली आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी 15 मिनिटं बाळासाहेब ठाकरे यांची प्रशंसा करुन दाखवावी आणि ठाकरे गटाने कॉंग्रेस नेत्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 15 मिनिटं प्रशंसा करुन दाखवावी, असे आव्हान मोदींनी दिले. असे थेट आव्हान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. तसेच महाराष्ट्राची निवडणूक आणि वसुली कर्नाटक व तेलगंनामध्ये सुरु आहे. कर्नाटकामध्ये दारुच्या दुकानदारांकडून 700 करोड रुपयांची वसुली केली आहे. ही कॉंग्रेस पार्टी घोटाळे करुन निवडणूक लढवत आहे. तर विचार करा निवडणूक जिंकल्यानंतर किती घोटाळे करेल. आम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे महाघोटाळाचे ATM नाही होऊन देणार. तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की, एक आहे तर सेफ आहे, असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
कॉंग्रेसने जातींमध्ये भांडण लावली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोल्याच्या प्रचारसभेतून कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. मोदी म्हणाले की, “कॉंग्रेस पक्षाला माहिती आहे की देश जेवढा कमजोर असेल तेवढी कॉंग्रेस मजबूत होईल. आणि देश यामुळे मजबूर होईल. मागच्या 75 वर्षांच्या इतिहास जाणून घ्या. कॉंग्रेस वेगवेगळ्या जातींमध्ये भांडणं लावण्याचं काम करते. आणि हीच कॉंग्रेसची नीती आहे. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसने कधीच दलित समाजाला एकजुट होई दिले नाही. आदिवासी आणि ST समादाला देखील वेगवेगळ्या जातींमध्ये वाटून टाकलं. त्यांची वेगळी ओळख निर्माण होऊ नये म्हणून अशी खेळी खेळली. भांडण लावून कोणाचा आवाज बुलंद होणार नाही, असा डाव कॉंग्रेसने खेळला. त्यामुळे कॉंग्रेसच्या या प्रवृत्तीपासून सावध राहावे लागेल,” असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
हे देखील वाचा : Ajit Pawar म्हणाले, ‘त्यांच्यासारखे मोठे नेता’…PM मोदी करणार नाहीत बारामतीत प्रचार
संविधानाच्या प्रती वाटणारे हे पापी लोकं…
पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान आणि कलम 370 वरुन राहुल गांधी यांना घेरले. ते म्हणाले की, “यांचं सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान काश्मीरमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. हे जे लोक संविधानाच्या प्रती आणि कोरी कागद वाटत फिरत आहेत ना हे किती पापी लोक आहे ते मी सांगतो. देशातील लोकांच्या धुळफेक यांनी केली. संविधान वाचवण्याची भाषा करतात आणि त्यांच्या 70 वर्षांच्या सरकारमध्ये दोन संविधान देशामध्ये चालवले जात होते. हे काश्मीरला अनेक दशकांनी मागे ढकलू पाहत आहेत,” असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस व राहुल गांधी यांच्यावर केला आहे.