Photo Credit- Social Media
इंदापूर : इंदापूर शहरातील समस्त व्यापारी वर्ग नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर आता उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील नेते व ग्रामस्थांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नियोजित पुलाबद्दल महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केलेले वक्तव्य त्यांना भोवणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Election 2024: वडगाव शेरीत भाजपच्या जगदीश मुळीकांचा यू-टर्न; देवा भाऊंचा एक फोन आणि…
28 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भरत शहा व मुकुंद शहा यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यावेळी भरत शहा यांनी इंदापूर शहर व्यापारी संघाच्या वतीने भीमा नदीवर शिरसोडी-कुगाव हा पूल बांधावा या व इतर मागण्यांचे निवेदन पवार यांना दिले होते. पुलाचे काम निश्चितपणे मार्गी लावण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. त्यानंतर वेगाने सूत्रे हलवून त्या पुलासाठी 384 कोटी रुपये मंजूर केले. त्याची घोषणा 6 एप्रिल रोजी झालेल्या जाहीरसभेत त्यांनी करुन ही टाकली.
विशेष म्हणजे या कामासाठी पाठपुरावा करणारे आमदार दत्तात्रय भरणे व आता शरद पवार गटाचे गटाचे विधानसभेचे उमेदवार असणारे हर्षवर्धन पाटील व्यासपीठावरच होते. त्यावेळी व शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळेपर्यंत अजित पवार यांच्या त्या निर्णयाबाबत चकार शब्दही न बोलणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी या पुलासाठी आत्ताच इतका निधी देण्याची गरज नव्हती. हे काम नंतरही करता आले असते, असे वक्तव्य केले.
या वक्तव्याच्या विरोधात व्यापारी वर्गाच्या प्रतिकूल प्रतिक्रिया उमटल्या. हा वर्ग न बोलता वाद न घालता कृती करतो. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी बहुतांश व्यापारी वर्गाची मते गमावल्याची चर्चा होत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब व्यवहारे, तालुका उपाध्यक्ष नानासाहेब नरुटे व महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतल्याने पाणलोट क्षेत्रातील मते ही हर्षवर्धन पाटील यांच्यापासून दूर जातात की काय अशी स्थिती उद्भवली आहे.
Maharashtra Assembly Elections 2024 : 288 जागांवर 7995 उमेदवार रिंगणात, महायुती-मविआमध्ये किती जागांवर कोण लढणार?
पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब व्यवहारे म्हणाले की, व्यापारी संघटनेच्या एका अर्जामुळे अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांनी 384 कोटी रुपये खर्चाच्या पुलाच्या कामाला मंजूरी दिली. इंदापूर व करमाळा तालुका जोडण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम केल्याबद्दल आम्ही आमदार दत्तात्रय भरणे यांचे आभार मानतो.