सदा सरवणकर व अमित ठाकरे यांची भेट झाली (फोटो - टीम नवराष्ट्र)
माहिम : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदार केंद्राबाहेर अक्षरक्षः रांग लावून मतदान करत आहेत. प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली असून शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. माहिम विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. माहिममध्ये शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर, मनसे नेते अमित ठाकरे व महाविकास आघाडीचे नेते महेश सावंत यांच्यामध्ये लढत होत आहे. सदा सरवणकर यांनी उलटा धनुष्यबाण लावला होता. हे लक्षात येताच अमित ठाकरे यांनी केलेल्या कृतीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
माहिम विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदार लढत होत आहे. मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले. याचवेळी सदा सरवणकर यांनी देखील दर्शन घेतले. या दोघांनी हस्तांलोदन केले. एकमेकांविरोधाक चुरशीची लढत देणार असलेले या नेत्यांमधील हसती खेळती लढत सर्वांच्या पसंतीस उतरली आहे. यावेळी अमित ठाकरे यांनी केलेल्या एका कृतीमुळे सर्वांचे मन जिंकले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दर्शनासाठी आलेल्या सदा सरवणकर यांनी आपल्या पक्षाचे चिन्ह कपड्यांवर लावले होते. मात्र हे चिन्ह त्यांनी उलटे लावले होते. सदा सरवणकर यांनी जॅकेटवर उलटा धनुष्यबाण लावला होता. अमित ठाकरे यांच्यासोबत बातचीत करताना त्यांच्या ही बाब लक्षात आली. अमित ठाकरे यांनी सदा सरवणकर यांच्या पक्षाचे चिन्ह असलेला धनुष्यबाण सरळ केला. अमित ठाकरे यांची ही विरोधकांबाबत असलेली आपुलकी सर्वांना भावली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना अमित ठाकरे व सदा सरवणकर यांची भेट झाली. या दोन्ही उमेदवारांनी एकमेकांकडे पाहून हस्तांदोलन केलं अन् एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी सदा सरवणकर म्हणाले, “मी सर्वच उमेदवारांना मन:पुर्वक शुभेच्छा देतो. हा लोकशाहीचा महोत्सव आहे. यात सर्वंच उमेदवार जिंकता आले असते तरी चांगलं झालं असतं. एकनाथ शिंदेंसारखा दयावान आणि गोरगोरीबांची दया असणारा व्यक्ती पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. मी माझे १०० टक्के दिले आहेत,” असे मत सदा सरवणकर यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
यावेळी अमित ठाकरे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, “मी बाप्पाकडे काही मागत नसतो. अशा महत्त्वाच्या प्रसंगी मी मंदिरात येतो. बाप्पाने मला आधीच खूप काही दिलंय. फक्त मी आशीर्वाद घेण्याकरता येथे आलो आहे,” असे मत अमित ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.