नवीन मंत्रिमंडळात शिवसेना शिंदे गटाचे किती मंत्री? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितले...
नवी मुंबई/ सिद्धेश प्रधान :- नेरूळ येथे भाजपा मंदा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा व मुख्यमंत्र्यांची सभा झाली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी बंडखोर नेते विजय नाहटा यांच्या विरोधात थेट भूमिका घेत कार्यकर्त्यांना दम दिला.
नाहटा यांना कायमचा रामराम करायचा, अशी जहरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय नाहटा यांच्यावर केली. यापुढे मुख्यमंत्री शिंदे असंही म्हणाले की, ज्यांनी बेईमानी केली त्यांना शिवसैनिक त्यांची जागा दाखवणार, या बेईमानी लोकांची गाठ एकनाथ शिंदे सोबत आहे हे विसरू नका. त्यामुळे जे त्याचे काम करतील त्यांचा देखील करेक्ट कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. ज्यांनी गद्दारी केली त्यांचा हिशोब एकनाथ शिंदे घेणार असल्याचा इशाराच मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्याने नाहटा आणि त्यांना समर्थन देणाऱ्या काही शिवसैनिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
महायुतीसंदर्भात बातम्यांसाठी इथे क्लीक करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना मंदा म्हात्रे यांची स्तुती केली. यावेळी त्यांनी मी मंदा म्हात्रे यांचा भाऊ म्हणून पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मंदा म्हात्रे या भावूक झालेल्या दिसून आल्या. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळलेले दिसून आले. यावेळी मंदा म्हात्रे नवराष्ट्रशी बोलताना म्हणल्या की, मी माझ्या घरात सर्वात लहान आहे. मला माझ्या मोठ्या भावाने वाढवले, सांभाळले आज मला त्यांची आठवण आली त्यामुळे अश्रू तरळले अशी प्रतिक्रिया मंदा म्हात्रे यांनी नवराष्ट्रला दिली.
नेरूळ येथील प्रचार सभेत बोलताना मंदा म्हात्रे म्हणल्या की, अनेक कामे अपूर्ण राहिली आहेत. त्यांची कामे मला करायची आहेत. मी तिकीट मागण्यासाठी कोणाकडे गेलेली नव्हती. मी कोणाकडे पैसे घेऊन गेलेली नाही. अनेकांनी सांगितले त्या बोलतात मात्र मी जनतेसाठी बोलते. मी कोणत्या विकासकाला कधी कॉल करत नाही. जनतेसाठी भांडणे हे माझे काम आहे. माझे नाव पुसण्याचे काम काहींनी केले. त्यांना उत्तर देण्याचे काम आपण करायचे आहे. पहिली आमदार असेन मी महाराष्ट्रात की कोविडमध्ये एका महिन्यात वर्षभराचा पाच कोटी निधी दिला. यांनी रुग्णालयावर स्टे आणला. त्यात रोजगार कोणाला मिळणार आहे. माझी कामे अडवली असा आरोप विरोधकांवर मंदा म्हात्रे यांनी केला.
यावेळी किशोर पाटकर म्हणाले की, नवी मुंबईत स्थानिक भूमिपुत्र तसेच बाहेरून आलेले शहरातील नागरीक यांना कायम मंदा म्हात्रे यांनी मदत केली आहे. आम्ही 1987 साली सिडकोची घरे घेतली होती. आणि लगेच 1991साली धोकादायक झाली होती. आम्हाला जबरदस्तीने काढण्यात आले. जुईनगरला ठेवण्यात आले. 2003 पर्यंत आम्ही ट्रान्झिस्मट कॅम्पमध्ये राहत होता. दरवर्षी नाईक कंपनी कायम घरांचे आश्वासन देत होते. मात्र मंदा म्हात्रे आमदार झाल्यावर एफएसआयचा जिरा निघाला. फडणवीस यांनी तो जीआर काढला.आमच्यासाठी देवच पावला. मुख्यमंत्री एक महिना झाल्यावर एकच महिन्यात जी आर आला. एकनाथ शिंदे यांच्यामुळे ४ एफएसआयचा जीआर मिळाला. फ्री होल्ड असो वा गरजेपोटी घरांबाबत निर्णय घेण्यात आला असे पाटकर म्हणाले.