विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. अवघ्या एका महिन्यावर निवडणूका आल्या असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची असून यामध्ये अनेक तरुण नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. (फोटो - सोशल मीडिया)
Young Political Leaders in Maharashtra Assembly Elections

बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार कुटुंबियांमध्ये लढत होत आहे. काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे. शरद पवार यांनी जबाबदारी तरुण नेतृत्वावर युगेंद्र पवार यांच्यावर सोपावली आहे.

अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भोकर विधानसभा मतदारसंघातून श्रीजया चव्हाण यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली असून त्या तरुण नेत्या म्हणून पुढे येत आहेत.

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अमित ठाकरे यांची ही पहिलीच विधानसभा असून त्यांच्या रुपाने तरुण पिढी राजकारणाकडे वळत आहे.

उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी पर्यावरण मंत्री म्हणून काम केलेले आदित्य ठाकरे यांचा चाहतावर्ग मोठा आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून ते विद्यमान आमदार असून आता पुन्हा एकदा ते निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत.

रोहित पवार हे देखील राजकारणातील तरुण नेते म्हणून लोकप्रिय आहेत. 2019 च्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवलेल्या रोहित पवार यांनी आपल्या पहिल्याच टर्ममध्ये लक्षवेधी काम केले. आता त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे.

सुजय विखे पाटील यांनी पहिल्याच राजकारणाच्या एन्ट्रीमध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवून दिल्ली गाठली. मात्र यंदाच्या लोकसभेमध्ये मात्र त्यांचा पराभव झाला. आता ते विधानसभेसाठी संगमनेर मधून निवडणूक लढवत आहेत.

सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनी अवघ्या काही वर्षांमध्ये राजकारणामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिला व बालकल्याण खाते सांभाळताना त्यांनी निभावलेली जबाबदारी सर्वांना आवडली आहे.






