(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Bigg Boss 20 Eviction: सलमान खानचा बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 20’ सुरू होऊन काही दिवस झाले असून, शोमध्ये दररोज नवनवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. घरातील स्पर्धकांमध्ये होणारे वाद, टास्क आणि त्यांचं वागणं यामुळे सोशल मीडियावरही सतत चर्चा सुरू आहे. सध्या शोमध्ये ‘वीकेंड का वार’ सुरू असून, नुकत्याच प्रसारित झालेल्या शनिवारच्या एपिसोडमध्ये सलमान खानने काही स्पर्धकांना चांगलंच सुनावलं.
यावेळी सलमान खानने रितू तिवारीच्या वागण्यावर नाराजी व्यक्त करत तिची चांगलीच शाळा घेतली. त्यानंतर रितूला इतर स्पर्धकांची तसेच सलमान खानची माफी मागावी लागली. या एपिसोडला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता शोमध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
या आठवड्यात यंग डीएसए आणि ईशा रिखी हे दोनच स्पर्धक एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणाचा ‘बिग बॉस 20’मधील प्रवास संपणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर ईशा रिखीच्या एलिमिनेशनची चर्चा सुरू झाली आहे. ‘बिग बॉस 20’च्या ‘डिजिटल न्यूज हब’ या फॅन पेजनुसार, ईशा रिखी या वीकेंडला शोमधून बाहेर पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, निर्मात्यांकडून किंवा शोमध्ये अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
ईशा रिखीचा खेळ ठरला चर्चेचा विषय
ईशा रिखीने ‘बिग बॉस 20’च्या घरात प्रवेश केल्यापासून तिची उपस्थिती तुलनेने कमी असल्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे. इतर स्पर्धकांच्या तुलनेत तिचं शोमधील योगदान कमी असल्याने या आठवड्यात तिला नॉमिनेशनला सामोरं जावं लागलं.
एका टास्कदरम्यान ईशा रिखीने आपली लाईफलाइनही गमावली होती. त्यामुळे आता तिचा शोमधील प्रवास संपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फॅन पेजने केलेल्या दाव्यानुसार, ईशा रिखी या वीकेंडला ‘बिग बॉस 20’च्या घरातून बाहेर पडू शकते. आगामी एपिसोडमध्ये सलमान खान तिच्या एलिमिनेशनची घोषणा करताना दिसणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
मात्र, ईशा रिखीचं एलिमिनेशन अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेलं नाही. त्यामुळे अंतिम निर्णयासाठी आगामी एपिसोड प्रसारित होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.






