Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅप्टन भोंदू बाबाचा पर्दाफाश करणार ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’, मोशन पोस्टर प्रदर्शित; चित्रपटाची घोषणा

सध्या समाजात घडणाऱ्या घटना या हादरवून टाकणाऱ्या आहेत आणि अनेक भोंदू बाबांची प्रकरणंही उघडकीला येत आहेत. आजपर्यंत समाजात घडणाऱ्या अनेक घटनांचा आढावा घेण्यासाठी आता नवा चित्रपट भेटीला येत आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 27, 2026 | 11:13 AM
महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स चित्रपटाची घोषणा

महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स चित्रपटाची घोषणा

Follow Us
Close
Follow Us:
  • नव्या मराठी चित्रपटाची घोषणा
  • मोशन पोस्टर झाले प्रदर्शित 
  • महाराष्ट्र एपस्टिन फाइल्सद्वारे उलगडणार भोंदू बाबांचे कारनामे 
समाजात घडणाऱ्या घटनांचे पडसाद कित्येकदा रुपेरी पडद्यावरही उमटतात आणि चित्रपटांच्या माध्यमातून काही अप्रकाशित पैलू उजेडात येतात. आजवर समाजात घडलेल्या अनेक घटना आणि प्रकरणांवर आधारित वास्तवदर्शी चित्रपट बनले आहेत. समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम करणाऱ्या या चित्रपटांनी सरकारी व्यवस्थांनाही धारेवर धरले आहे. नुकतीच घोषणा झालेल्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या मराठी चित्रपटातही संपूर्ण महाराष्ट्र हादरवणाऱ्या अशाच एका गाजलेल्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात येणार आहे. 

मोशन पोस्टर प्रदर्शित करून ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. २ ऑक्टोबर २०२६ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याचे मोशन पोस्टरवर घोषित करण्यात आले आहे.

खरात प्रकरणावर आधारित सिनेमा लवकरच! Bigg Boss Fame अभिनेत्री साकारणार रुपाली चाकणकरांची भूमिका

चित्रपटाची घोषणा 

सोशल मीडियावर मोशन पोस्टर प्रदर्शित करून आगामी ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. जैन फिल्म प्रोडक्शन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देवेंद्र भट, सुर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यांनी स्वीकारली आहे. वास्तवदर्शी कथानकावर आधारलेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत यांनी एक आव्हानात्पक पाऊल टाकले आहे. 

सभ्यतेचे मुखवटे गळून पडणार 

‘आता सगळं उघड होणार…!’ ही टॅगलाईन हा चित्रपट अनेकांचा पर्दाफाश करणार असल्याचे संकेत देण्यासाठी पुरेशी आहे. आता हा चित्रपट कोणकोणत्या गोष्टी उघड करतो, ते प्रदर्शनानंतरच समजेल. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेकांचे सभ्यतेचे मुखवटे आपोआप गळून पडणार आहेत. या चित्रपटात कॅप्टन भोंदू बाबाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरवर एक पाठमोरी व्यक्ती उभी असल्याचे पाहायला मिळते. या व्यक्तीने पाठीमागे घेतलेल्या हातात पाचशे रुपयांच्या नोटांची बंडल्स आहेत. याने कुर्ता-पायजमा आणि जॅकेट असा सभ्य गृहस्थांचा पोषाख परिधान केलेला आहे. त्याच्या चहूबाजूला क्राईम सीनच्या पिवळ्या फिती बांधलेल्या आहेत. त्याच्या समोरील भिंतीवरील काही फोटोंमध्ये ‘प्रश्नचिन्ह’ आहे. एकावर ‘नाशिक’ आणि दुसऱ्यावर ‘भोंदूबाबा’ असे लिहिले आहे. समोरील टेबलवर डाव्या बाजूला तांब्याचा पाण्याचा जग आणि भांडे आहे, तर उजव्या बाजूला पुस्तके, चहाचा ग्लास आणि एलिश हनी आहे. हे सर्व चित्र पाहिल्यावर हा चित्रपट कोणत्या कॅप्टन भोंदूबाबाच्या कृत्यांचा पर्दाफाश करणार आणि कोणाची एपस्टिन फाईल ओपन करणार हे चाणाक्ष मराठी प्रेक्षकांना वेगळे सांगण्याची गरज नाही. 

“मातेची हाक आली तरच दर्शन घडतं!” रणवीर सिंग यांनी घेतले चामुंडेश्वरी देवीचे दर्शन; चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण

कथा अजूनही गुलदस्त्यात 

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाची कथा सध्या तरी गुलदस्त्यात असून, कलाकारांची नावेही गुप्त ठेवण्यात आली आहेत. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहीली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. डिओपी आकाश काकडे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणार असून, कला दिग्दर्शन अक्षय आंबेकर करणार आहेत. वेशभूषा आकांक्षा गांधी यांची असून, सचिन घणवंत या चित्रपटाचे प्रोडक्शन हेड आहेत तसेच नेहा घोडके प्रॉडकशन कंट्रोलर म्हणून काम पाहणार आहेत.

Web Title: Maharashtra epstein files to expose captain bhondu baba motion poster released film announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • Entertainment News
  • marathi movie
  • Marathi Movie News

संबंधित बातम्या

‘मला नेहमीच तुमची आठवण येते’; वडील सुनील दत्त यांच्या आठवणीने संजय दत्त झाला भावूक
1

‘मला नेहमीच तुमची आठवण येते’; वडील सुनील दत्त यांच्या आठवणीने संजय दत्त झाला भावूक

जूनमध्ये 1-2 नाहीतर 7 हिंदी चित्रपट होणार रिलीज; ‘कॉकटेल 2’पासून ‘बंदर’पर्यंत…
2

जूनमध्ये 1-2 नाहीतर 7 हिंदी चित्रपट होणार रिलीज; ‘कॉकटेल 2’पासून ‘बंदर’पर्यंत…

FWICE च्या कारवाईनंतर पहिल्यांदाच समोर आला Ranveer Singh, सोडले मौन; म्हणाला, ‘मी नेहमीच सन्मान करतो…’
3

FWICE च्या कारवाईनंतर पहिल्यांदाच समोर आला Ranveer Singh, सोडले मौन; म्हणाला, ‘मी नेहमीच सन्मान करतो…’

दुहेरी आनंद! दिव्यांका – विवेकने दिली चाहत्यांना खुषखबर, ‘करण अर्जुन आ गए’; जुळ्या मुलांना दिला जन्म
4

दुहेरी आनंद! दिव्यांका – विवेकने दिली चाहत्यांना खुषखबर, ‘करण अर्जुन आ गए’; जुळ्या मुलांना दिला जन्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.