Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samay Raina: ‘न्यायालयाची दिशाभूल…’, समय रैनाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, ठोठावला भारी दंड; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

Samay Raina News: इंडिया गॉट लेटेंट वादात कॉमेडियन समय रैनाला सुप्रीम कोर्टाने ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या अवमानप्रकरणी सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने रैनाच्या आचरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 14, 2026 | 05:17 PM
समय रैनाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, ठोठावला भारी दंड (Photo Credit- X)

समय रैनाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, ठोठावला भारी दंड (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘न्यायालयाची दिशाभूल…’ समय रैनाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका
  • ठोठावला भारी दंड
  • जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?
प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाला (Samay Raina) सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा झटका बसला आहे. ‘इंडिया गॉट लेटेंट’ (India Got Latent) या शोशी संबंधित वादात न्यायालयाने समय रैनाला न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३ लाख रुपयांचा भारी दंड ठोठावला आहे. “रैनाने न्यायालयाची दिशाभूल केली आणि न्यायालयाच्या आदेशांचे उघडपणे उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे.” अशा शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त करत कोर्टाने कॉमेडियनच्या आचरणावर कडक ताशेरे ओढले.
Supreme Court slams comedian Samay Raina, saying he has taken the court for a ride and has brazenly violated the orders of the court. Supreme Court also imposes a fine of Rs 3 lakh each on Raina and others for not complying with the apex court’s previous direction. Supreme… pic.twitter.com/RgObQN9txq — ANI (@ANI) July 14, 2026


सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल न्यायालयाने रैना आणि इतरांवर प्रत्येकी ३ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. तसेच, न्यायालयाच्या आदेशांचे पालन केल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी त्यांना दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. तसेच “रैना नेमका कोणत्या प्रकारचा युथ आयकॉन (Youth Icon) आहे, हे विचार करून चिंता वाटते,” अशी गंभीर टिप्पणीही सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

‘असे युथ आयकॉन असणे चिंताजनक’

या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती वी. मोहना यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर झाली. सुनावणी दरम्यान क्योर एसएमए फाउंडेशनच्या वतीने वरिष्ठ वकील अपराजिता सिंह यांनी बाजू मांडली. “न्यायालयाने आधी आदेश देऊनही समय रैनाने ‘एसएमए फाउंडेशन’ किंवा या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांशी कोणताही संपर्क साधलेला नाही. ते आपले शोज मात्र नियमित करत आहेत,” असे त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. यावर तीव्र आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने म्हटले की, “ते (समय रैना) नेमके कोणत्या प्रकारचे युथ आयकॉन आहेत, हे समजण्यापलीकडे आहे आणि हे पाहून चिंता वाटते.” यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही सहमती दर्शवत, “आमच्या देशातील तरुणांकडे यांच्यापेक्षा कितीतरी पटीने सरस आयकॉन उपलब्ध आहेत,” असे म्हटले.

Samay Rainaच्या जुन्या व्हिडिओवरून नवा वाद; हार्ट अटॅकवरील विनोदामुळे सोशल मीडियावर संताप

सॉलिसिटर जनरल यांनी उठवला मुद्दा

न्यायालयाने सुरुवातीला समय रैनावर १० लाख रुपयांचा प्रचंड दंड ठोठावला होता. मात्र, रैनाच्या वकिलांनी केलेल्या विनंतीनंतर आणि युक्तिवादानंतर कोर्टाने हा दंड कमी करून ३ लाख रुपये निश्चित केला. सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणी दरम्यान एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की, “समय रैना आणि इतर कॉमेडियन्सनी स्वतःच्या वर्तनात सुधारणा करण्यासाठी आतापर्यंत नेमकी काय पावले उचलली आहेत?” सुनावणीच्या वेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी समय रैनाच्या काही अलीकडच्या टिप्पण्या आणि समाज माध्यमांवरील आचरणाचा मुद्दा न्यायालयासमोर मांडला आणि अशा वक्तव्याकडेही न्यायालयाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी केली.

‘अद्यापही खरी माफी मागितलेली नाही’

क्योर एसएमए फाउंडेशनच्या वतीने वकील अपराजिता सिंह यांनी स्पष्ट केले की, जरी काही दिव्यांग व्यक्तींसाठी कार्यक्रम आयोजित केल्याचा दावा रैनाच्या बाजूने केला जात असला, तरी न्यायालयाच्या मूळ आदेशानुसार क्योर एसएमए फाउंडेशनशी कोणताही थेट संपर्क साधला गेलेला नाही. तसेच, समय रैनाच्या बाजूने अजूनही या प्रकरणावर कोणतीही वास्तविक, प्रामाणिक आणि स्पष्ट माफी (Apology) मागण्यात आलेली नाही, याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

YouTube वर ऐतिहासिक कामगिरी; Samay Rainaचा “Still Alive” ठरला ग्लोबल हिट कॉमेडी स्पेशल

Web Title: Major blow to sameer raina from the supreme court slapped with a hefty fine find out the details of the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Samay Raina
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Ram Kapoor-श्रेया यांच्या किसिंग सीनवरून वाद; आरोपांवर अभिनेत्याने अखेर सोडलं मौन, म्हणाले की…
1

Ram Kapoor-श्रेया यांच्या किसिंग सीनवरून वाद; आरोपांवर अभिनेत्याने अखेर सोडलं मौन, म्हणाले की…

Hrithik Roshan Son News: हृतिक रोशनच्या लेकाची म्युझिक इंडस्ट्रीत दमदार एन्ट्री! रेहानच्या पहिल्याच गाण्याने वेधलं सगळ्यांचं लक्ष
2

Hrithik Roshan Son News: हृतिक रोशनच्या लेकाची म्युझिक इंडस्ट्रीत दमदार एन्ट्री! रेहानच्या पहिल्याच गाण्याने वेधलं सगळ्यांचं लक्ष

Richa Sinha: रिचा सिन्हाची BY FARच्या ‘Friend of the Brand’ म्हणून निवड
3

Richa Sinha: रिचा सिन्हाची BY FARच्या ‘Friend of the Brand’ म्हणून निवड

Tiger Shrof: फिटनेस आयकॉन टायगर श्रॉफ तरुणाईसाठी ठरतोय प्रेरणा देणारा चेहरा !
4

Tiger Shrof: फिटनेस आयकॉन टायगर श्रॉफ तरुणाईसाठी ठरतोय प्रेरणा देणारा चेहरा !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.