Jay Jay Swami Samarth Serial: स्वामींनी दिला संकटाचा इशारा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
इराची परीक्षा सुरू होणार आहे… सावळ्याचं सत्य अजूनही गुपित आहे… आणि गणपतच्या रूपाने या नात्यावर संकटाची सावली पडली आहे! आता स्वामींची लीला कोणतं नवं वळण घेणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सावळ्याला त्याच्या आयुष्याचं खरं सत्य कधी कळणार? गणपतच्या नजरेपासून इराला सावळ्या वाचवू शकेल का?
इराची आणि सावळ्याची ही वाढती जवळीक त्यांना स्वामींच्या नियोजित मार्गावर घेऊन जाणार की एका मोठ्या संघर्षाकडे? आणि एका दरोडेखोराचं भक्तात होणारं हे अद्भुत परिवर्तन नेमकं कसं घडणार?या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मालिकेचे आगामी भाग नक्की पाहा! पहा, ‘जय जय स्वामी समर्थ – उत्सव बाप्पाचा, लीला स्वामींची’, दररोज रात्री 8:10 वा. फक्त कलर्स मराठीवर. Jay Jay Swami Samarth Serial:
सावळ्याच्या आयुष्यावर झालेला अन्याय जेव्हा इराला समजतो, तेव्हा त्याच्याबद्दल तिच्या मनात केवळ सहानुभूती राहत नाही, तर त्याला या परिस्थितीतून बाहेर काढण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. सावळ्यालाही इराच्या सहवासाची जाणीव होऊ लागली आहे. मात्र, आपल्या आयुष्यात दडलेलं सत्य त्याला अद्याप माहीत नाही. स्वामींना मात्र भविष्यात काय घडणार आहे याची पूर्ण जाणीव आहे.
म्हणूनच इरा सावळ्याला सत्य सांगण्याचा प्रयत्न करते, तेव्हा स्वामी तिला थांबवतात. “सांगायचं असतं तर आम्ही नसतं का सांगितलं एव्हाना… त्याची वेळ अजून यायची आहे!” स्वामींच्या या शब्दांमुळे प्रश्न आणखी गडद होतो—इराला सावळ्याचं सत्य कधी सांगता येणार? आणि तो क्षण येईपर्यंत तिच्या आणि सावळ्याच्या नात्याचं काय होणार?
सुभानची एंट्री… आणि नात्यासमोर उभं ठाकणारं नवं संकट! – या सगळ्यात सावळ्याच्या आयुष्यात एंट्री होते सुभानची एक हिंसक, निर्दयी आणि गुन्हेगारी जगात रमलेला चेहरा. त्याच्या आगमनाने सावळ्याच्या भूतकाळाचे धागे पुन्हा घट्ट होतात; पण त्याहून मोठा धक्का तेव्हा बसतो, जेव्हा सुभानची नजर इरावर पडते. सुभानच्या विकृत नजरेची जाणीव होताच सावळ्या संतापतो. इराच्या सन्मानासाठी तो सुभानला थेट विरोध करतो. आणि इथेच एका मोठ्या संघर्षाची ठिणगी पडते. “ठिणगी पडली… आता द्रौपदीवरून महाभारत होणार!” असा स्वामींचा इशारा या संघर्षाची तीव्रता आणखी वाढवतो.
मात्र या कथेतला सर्वांत मोठा आणि कधीही न पाहिलेला प्रवास अजून बाकी आहे एक दरोडेखोरापासून त्याचा एक भक्तामध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा! ज्याच्या हातात आजवर गुन्ह्याचं शस्त्र होतं, त्याच हातात उद्या स्वामींच्या नामाची माळ असेल का? ज्याच्या आयुष्यात हिंसा आणि दहशत होती, तिथे श्रद्धेचा प्रकाश कसा पोहोचणार? इराची साथ या परिवर्तनात किती निर्णायक ठरणार? आणि स्वामींच्या कृपेने सावळ्याला त्याच्या नियतीच्या फेर्यातून मुक्ती मिळणार का? अखेर इराच्या अपहरणामागे नेमकं काय सत्य दडलंय ?.
Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे






