Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Netflix वर गंभीर आरोप! निकोलस केजचा चित्रपट चोरल्याचा दावा; निर्मात्याने ठोकला 1000 कोटींचा खटला

निकोलस केजच्या 'Fortitude' चित्रपटाची मास्टर कॉपी नेटफ्लिक्सच्या स्टुडिओमधून चोरीला गेल्याचा आरोप करत निर्माता सायमन अफ्राम यांनी तब्बल ₹1000 कोटींच्या नुकसानभरपाईसाठी न्यायालयात धाव घेतली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 31, 2026 | 03:41 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

हॉलिवूडमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं असून, आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सविरोधात तब्बल १०५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १००१.९७ कोटी) नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्यात आला आहे. निर्माता सायमन अफ्राम यांनी अभिनेता निकोलस केज अभिनीत त्यांच्या अप्रदर्शित ‘Fortitude’ चित्रपटाची मास्टर कॉपी नेटफ्लिक्सच्या स्टुडिओमधून चोरीला गेल्याचा आरोप केला आहे.

कॅलिफोर्नियाच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेनुसार, जून महिन्यात नेटफ्लिक्सच्या विनंतीवरून निर्मात्यांनी दुसऱ्या महायुद्धावर आधारित ‘Fortitude’ या चित्रपटाची एनक्रिप्ट न केलेली मास्टर कॉपी कंपनीकडे सुपूर्द केली होती. मात्र, नऊ दिवसांनी नेटफ्लिक्सने ईमेलद्वारे कळवलं की, त्यांच्या कार्यालयातील डेस्कवरून अनेक हार्ड ड्राइव्ह चोरीला गेल्या असून त्यामध्ये ‘Fortitude’ची ड्राइव्हही होती.

चित्रपट पूर्ण होण्यासाठी लागली सात वर्षे

निर्मात्यांच्या वकिलांनी दावा केला आहे की, हा चित्रपट पूर्ण होण्यासाठी सात वर्षे लागली आणि त्यासाठी ४५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ₹४२९.४१ कोटी) खर्च करण्यात आला. हा चित्रपट नेटफ्लिक्स किंवा इतर वितरकांना विकण्याची तयारी सुरू असतानाच ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याचिकेत पुढे म्हटलं आहे की, चित्रपटाची मास्टर कॉपी चोरीला गेल्यानंतर पायरसीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पायरसी साइट्सवर चित्रपट उपलब्ध झाल्यास वितरक त्यासाठी कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक करणार नाहीत, त्यामुळे चित्रपटाचं व्यावसायिक मूल्य घटल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. नेटफ्लिक्सने हार्ड ड्राइव्हच्या सुरक्षेबाबत अधिक दक्षता घ्यायला हवी होती, असंही याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

August OTT Release : ऑगस्टमध्ये OTT वर मनोरंजनाचा महाडोस! ‘वेलकम टू द जंगल’ ते ‘KBC 18’; पाहा संपूर्ण यादी

नेटफ्लिक्सने आरोप फेटाळून लावले

दरम्यान, नेटफ्लिक्सने या आरोपांना फेटाळून लावत अधिकृत निवेदन जारी केलं आहे. कंपनीने म्हटलं आहे की, उद्योगमान्य सुरक्षा उपायांशिवाय सादर करण्यात आलेल्या चित्रपटाच्या नुकसानीची जबाबदारी आम्ही स्वीकारत नाही. तसेच, चित्रपटाचे हक्क आमच्याकडे नसले तरी निर्माते आणि त्यांच्या टीमला सहकार्य करण्यासाठी पायरसी तपास आणि अनधिकृत वितरणावर लक्ष ठेवण्यासारख्या अतिरिक्त उपाययोजना केल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

Ramayana Movie: भारतच नव्हे, पाकिस्तानातही ‘रामायण’ची क्रेझ; ट्रेलर पाहून पाकिस्तानी नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक

नेटफ्लिक्सने आणखी एक गंभीर आरोप करत म्हटलं की, सायमन अफ्राम यांचे वकील या परिस्थितीचा गैरफायदा घेत कंपनीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता न्यायालयात रंगणार असून, हॉलिवूडमध्ये याची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Netflix lawsuit nicolas cage fortitude movie copy theft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hollywood
  • Hollywood actor

संबंधित बातम्या

Patri Sarkar: स्वातंत्र्यलढ्याची धग रूपेरी पडद्यावर; ‘पत्री सरकार १९४२’चे पहिले पोस्टर प्रदर्शित
1

Patri Sarkar: स्वातंत्र्यलढ्याची धग रूपेरी पडद्यावर; ‘पत्री सरकार १९४२’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

Ramayana Movie: भारतच नव्हे, पाकिस्तानातही ‘रामायण’ची क्रेझ; ट्रेलर पाहून पाकिस्तानी नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक
2

Ramayana Movie: भारतच नव्हे, पाकिस्तानातही ‘रामायण’ची क्रेझ; ट्रेलर पाहून पाकिस्तानी नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक

August OTT Release : ऑगस्टमध्ये OTT वर मनोरंजनाचा महाडोस! ‘वेलकम टू द जंगल’ ते ‘KBC 18’; पाहा संपूर्ण यादी
3

August OTT Release : ऑगस्टमध्ये OTT वर मनोरंजनाचा महाडोस! ‘वेलकम टू द जंगल’ ते ‘KBC 18’; पाहा संपूर्ण यादी

Lara dutta : ‘रामायण’च्या ट्रेलरमधील लारा दत्ताच्या लूकवरून सोशल मीडियावर वाद; नेटकऱ्यांनी का केलं ट्रोल?
4

Lara dutta : ‘रामायण’च्या ट्रेलरमधील लारा दत्ताच्या लूकवरून सोशल मीडियावर वाद; नेटकऱ्यांनी का केलं ट्रोल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.