फोटो सौजन्य - Social Media
तन्वी म्हणते की “आज डोळे भरलेत ते लोकांच्या प्रेमामुळे! पण जेव्हा हातात मोबाईल घेऊन काही कमेंट्स वाचते तेव्हा अनेक जण म्हणतात की ‘मी Deserving नव्हते’ आणि हे माझ्यासाठी फार त्रासदायक आहे.” अशा काही कमेंट्समुळे तन्वीला वेदना होत आहेत त्यामध्ये ती पुढे म्हणते की “100 दिवसांचा हा खडतर प्रवास पार करून जेव्हा आपल्या हातात ती मानाची ट्रॉफी येते तेव्हा तो क्षण आयुष्यातला सर्वात सुवर्ण क्षण असतो पण तेव्हाच दुसऱ्या हातात मोबाईल घेऊन असे कमेंट्स वाचले तर मनात प्रश्न तयार होतो की ‘खरंच, मी या ट्रॉफीसाठी डिजर्व्हिंंग आहे का?'”
काही गोष्टींमुळे जरी तन्वी निराश असली तरी तिच्याकडे आनंदी राहण्याचा सगळ्यात मोठा पर्याय आहे. ते म्हणजे “Bigg Boss Season 6 मध्ये मिळवलेले यश!” पुढे तन्वी सांगते की, “मी द्वेष करणाऱ्यालाही प्रेमात पाडेल. एक दिवस नक्की येईल, जेव्हा लोकं म्हणतील तन्वी खरंच खऱ्या अर्थाने Bigg Boss season 6 च्या ट्रॉफीसाठी डिजर्व्हिंंग होती.” तन्वीने अतिशय सकारात्मक विश्वास दाखवून लोकांच्या नकारात्मक प्रतिसादालाही आपलेसे केले आहे.
तन्वी ठरली विजेता!
Bigg Boss Season 6 मध्ये तन्वीने बाजी मारली आहे तर राकेश बापट उपविजेता झाला आहे. विशाल Second रनर अप झाला आहे तर अनुश्रीने चौथ्या स्थानी बाजी मारली आहे.






