Nikki Tamboli Arbaaz Patel Breakup: जन्मोजन्मी साथ निभवण्याची शपथ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Nikki Arbaaz Unfollow Instagram: ‘बिग बॉस मराठी ५’मधून घराघरात पोहोचलेली निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल ही जोडी सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी मात्र कारण त्यांच्या नात्याशी संबंधित असल्याचे दिसत आहे. दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
निक्की आणि अरबाज यांची ओळख ‘बिग बॉस मराठी ५’च्या काळात जवळीकमध्ये बदलली. शोमध्ये दोघेही अनेकदा एकत्र दिसले. त्यांच्या नात्याबद्दल प्रेक्षकांमध्येही उत्सुकता होती. शो संपल्यानंतरदेखील दोघांचे नाते कायम असल्याचे दिसत होते. त्यानंतर ते ‘द ५०’ या रिअॅलिटी शोमध्येही एकत्र दिसले. Nikki Tamboli Arbaaz Patel Breakup:
या शोदरम्यान अरबाजने निक्कीसमोर खास अंदाजात प्रेम व्यक्त केले होते. त्याने तिला गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केले होते. त्यामुळे दोघांच्या नात्याची चर्चा आणखी वाढली होती. मात्र, या नात्याचा प्रवास नेहमीच सोपा नव्हता.
निक्कीने एका कार्यक्रमात सांगितले होते की, दोघांचा धर्म वेगळा असल्यामुळे तिच्या वडिलांना हे नाते मान्य नव्हते. तरीही तिने कुटुंबाच्या मतापेक्षा आपल्या नात्याला महत्त्व देत अरबाजसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दोघांच्या नात्याकडे चाहत्यांचे विशेष लक्ष होते.
आता ऑगस्टच्या शेवटच्या दिवसांत त्यांच्या सोशल मीडिया हालचालींमुळे परिस्थिती वेगळी असल्याचे संकेत मिळत आहेत. दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर अरबाज आणि निक्की यांनी काही अर्थपूर्ण पोस्ट केल्या. या पोस्टमध्ये विश्वास, फसवणूक आणि नात्यातील वचन याबद्दल बोलण्यात आले आहे.

अरबाजच्या पोस्टमध्ये जोडीदाराकडून विश्वासघात झाल्याच्या भावना व्यक्त झाल्या. त्याच्या मते, एखाद्या व्यक्तीने जोडीदाराची फसवणूक करून पुन्हा प्रेम असल्याचे सांगणे ही खूप मोठी गोष्ट आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या.
दुसरीकडे निक्कीच्या पोस्टमध्येही नात्यातील सत्य आणि वचन पाळण्याबाबत भाष्य करण्यात आले. नवीन व्यक्ती आकर्षक वाटल्यामुळेच नाते बिघडत नाही, तर आधीच्या नात्यातील जबाबदाऱ्या आणि दिलेली आश्वासने दुर्लक्षित झाल्यावर समस्या निर्माण होतात, असा तिच्या पोस्टचा अर्थ लावला जात आहे.
या सगळ्यामुळे निक्की आणि अरबाज यांच्यात खरंच दुरावा निर्माण झाला आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही स्पष्ट वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे सध्या सोशल मीडिया पोस्ट आणि अनफॉलो करण्याच्या प्रकारावरूनच चर्चा सुरू आहे. खरं कारण काय आहे, हे दोघांपैकी कोणी सांगितल्यानंतरच स्पष्ट होईल.






