Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Priyanka Chopra : ‘ती हसत नसतानाही..” वाराणसीत शूटिंगदरम्यान प्रियंका चोप्राचा जबरदस्त लूक समोर

Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दमदार भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली. दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या महत्त्वाकांक्षी वाराणसी चित्रपटातून तिचा पहिला अधिकृत लूक समोर

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 18, 2026 | 06:34 PM
Priyanka Chopra Varanasi First look (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Priyanka Chopra Varanasi First look (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

अभिनेत्री प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दमदार भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली. दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या महत्त्वाकांक्षी वाराणसी चित्रपटातून तिचा पहिला अधिकृत लूक समोर आला असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे हा लूक प्रियांकाच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित करण्यात आल्याने चाहत्यांसाठी ही आनंदाची दुहेरी भेट ठरली.

राजमौली यांनी स्वत: त्यांच्या सोशलमीडिया अंकाउंटवर प्रियांकाचे दोन वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर केलें. दोन्ही छायाचित्रांमध्ये तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन भिन्न बाजू पाहायला मिळतात. एक फोटोमध्ये ती गंभीर, आत्मविश्वासापूर्ण आणि धाडसी रुपात दिसते. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर आनंदी हास्य आणि उत्साही स्वभाव झळकताना दिसतो. या दोन वेगळ्या भावछटा पाहून चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Sonam Wangchuk : ‘अशी कायरता कधी पाहिलीये का?’ विशाल दादलानी भडकला! व्यक्त केला राग, म्हणाला ‘जागे व्हा!’

प्रियांका ‘मंदाकिनी’ हे महत्त्वाचे पात्र

या चित्रपटात प्रियांका ‘मंदाकिनी’ हे महत्त्वाचे पात्र साकारत आहे. तिच्या भूमिकेची फारशी माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी पोस्टरवरून हे पात्र कथानकात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तिच्या लूकमध्ये पारंपरिक आणि आधुनिक शैलीचा सुरेख मिलाफ दिसून येतो.

फोटो शेअर करताना राजामौली यांनी प्रियांकाच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करणारे काही शब्द लिहिले. त्यांच्या मते, तिच्या चेहऱ्यावरचे हास्य जितके आकर्षक आहे, तितकीच ती गंभीर मुद्रेत प्रभावी आणि ताकदीची वाटते. या छोट्याशा संदेशानेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू मुख्य भूमिकेत दिसणार

‘वाराणसी‘ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आला आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या पात्राची ओळख आधीच समोर आली असून, ते भगवान शिवाचे भक्त असलेल्या एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. काही प्रसंगांमध्ये त्यांचा वेगळा अवतारही पाहायला मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.

चित्रपटाची कथा, कलाकारांची निवड आणि राजामौली यांचे दिग्दर्शन या तिन्ही गोष्टींमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’सारखे भव्य चित्रपट दिल्यानंतर राजामौली यांच्या प्रत्येक नव्या प्रकल्पाकडे देशभरातील प्रेक्षकांचे लक्ष असते. त्यामुळे ‘वाराणसी’कडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

Salman Khan : सलमान खानच्या हस्ते घरांच्या चाव्या, झोपडपट्टीधारकांच्या आयुष्यात नवी सुरुवात

तिच्या अभिनयासोबतच तिच्या व्यक्तिरेखेची मांडणी

प्रियांका चोप्रासाठीही हा चित्रपट खास मानला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केल्यानंतर ती पुन्हा भारतीय प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या व्यक्तिरेखेची मांडणी कशी असेल, याबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

सध्या सोशल मीडियावर तिच्या नव्या लूकवर हजारो प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी तिच्या स्क्रीन प्रेझेन्सचे कौतुक केले आहे, तर काहींनी हा चित्रपट मोठा ब्लॉकबस्टर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून वेळ असला तरी कलाकारांचे लूक, पोस्टर्स आणि छोट्या झलकांमुळे वातावरण आधीच रंगले आहे. आता पुढे चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर कधी प्रदर्शित होणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Priyanka chopras varanasi look goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • Entertainment marathi
  • Marathi News

संबंधित बातम्या

घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप अनावर! डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक, रस्त्यावर आंघोळ-दात घासत अनोखा निषेध
1

घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप अनावर! डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक, रस्त्यावर आंघोळ-दात घासत अनोखा निषेध

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री
2

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत
3

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री
4

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.