फोटो सौजन्य - Social Media
श्रेयस तळपदे तसेच दीप्ती तळपदे यांनी या सिनेमाची निर्मित केली आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचे एक गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘महिषासुर मर्दिनी’ असे या गाण्याचे शीर्ष असून गाण्याचे गायन अवधूत गुप्ते याने केले आहे. या गाण्याचे कम्पोजिशन हितेश मोडक यांनी केले आहे तर Amppl Music ने या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.प्रशांत मदपूवार या गाण्याचा गीतकार असून Sanjay Taramati Patil यांनी गाण्याचे Sound सांभाळले आहे.
या गाण्याचे Sound Recording BTS सह गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. ज्यावेळी अवधूत Studio Room मध्ये गाणे Record करत असतो त्यावेळी सिनेमाचा निर्माता श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दीप्ती तळपदे बाहेर भक्तीत लीन झाल्याचे दिसून येतात. कारण ‘Mardini’ सिनेमातील ‘महिषासुर मर्दिनी’ हे गीत आई दुर्गेवर आधारित आहे.
सिनेमातील हे गीत ऐकून श्रेयस तसेच सिनेमातील इतर कलाकारांच्या चाहत्यांनी सिनेमाबद्दल उत्सुकता दर्शवली आहे. तसेच सिनेमाची प्रतीक्षा करत असल्याचे अनेक चाहत्यांनी सांगितले आहे.






