गोव्यात सोमवारी झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रमोद सावंत यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे सावंत सलग दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. सोमवारी संध्याकाळी पणजीत भाजपचे नवनिर्वाचित आमदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सावंत यांच्या नावावर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यात आला.
[read_also content=”केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई होणार? पालिकेच्या नोटीसविरोधात न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी, साऱ्यांच्या नजरा https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/action-will-be-taken-against-union-minister-narayan-ranes-bungalow-todays-hearing-on-the-petition-filed-in-the-court-against-the-notice-of-the-municipality-everyones-eyes-258128.html”]