पार्टी असो किंवा हार्टब्रेक अनेकांना दु:ख पचवायला नाहीतर आनंद सेलिब्रेट करायला दारु ही पाहिजेच असते. यातले अनेकजण बियर पिण्याला पसंती देतात. मात्र बियरबाबतची एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. अनेकांची अशी बोंब असते की काहीही झालं काहीही केलं तरी डास मलाच का जास्त चावतात? याला रक्तगट आणि तुमच्या शरीरातील अतिरिक्त उष्णता हे तर मोठं कारण आहेच त्याचबरोबर जर तुम्ही बियर पित असाल तर डास तुमच्या जवळ येण्याचं हे देखील एक मोठं कारण आहे. कसं ते जाणून घेऊयात…
तुम्ही बियर पितात तेव्हा नशा येते मात्र नशा फक्त तुम्हालाच नाही तर डासांना देखील चढते. नेदरलँडमधील एका अहवालानुसार, असं समोर आलं की ज्यांना मद्य प्यायची सवय असते अशी माणसं इतरांच्या तुलनेत डासांना स्वत:च्या जवळ जास्त आकर्षित करतात.
नेदरलँडमध्ये झालेल्या आरोग्यविभागातील संशोधनानुसार, बियर किंवा कोणतंही मद्य याने नशा येते. खरंतर डास नशेसाठी नाही तर बियर प्यायल्यानंतर माणसाच्या शरीरात काही रासायनिक क्रिया होतात त्यानंतर रक्तात याचे काही घटक मिसळतात. हेच घटक डासांना सर्वात जास्त आकर्षित करतात. अहवालात असे देखील सांगितलं गेलं आहे की, माणसाच्या शरीराचा वास डासांना 350 फुटांवरुन देखील सहजपणे येतो. त्यामुळे जर तुम्ही सतत म्हणत असाल की सर्वात जास्त डास तुम्हाला चावतात तर तुम्ही सुद्धा जर जास्त दारु पित असाल तर हे वेळीच कमी करा.
याचबरोबर डास फक्त बियरचा वासच नाही तर तुमच्या अंगात अतिउष्णता असेल किंवा शरीर स्वच्छ न ठेवता सतत दुर्गंध असला तरी देखील डास तुमच्या जवळ येतात. सतत घामाने माखलेल्या शरीराला उग्र वास येतो आणि डास यालाही जास्त आकर्षित होतात. यामुळे सतत वरचेवर आजारी पडणं, मलेरिया आणि डेंग्यूचं प्रमाण देखील याने वाढतं. त्यामुळे आपल्या शरीराची वेळीच .योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच तुम्ही झोपताना वापरत असलेली उशी आणि चादर देखील वेळच्या वेळी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. थोडक्यात काय तर शरीराची आणि आजुबाजूला वापरात असलेल्या गोष्टींची स्वच्छता राखल्यास तुमच्या जवळ डास येण्याचं प्रमाण देखील कमी होईल, संशोधनातून सिद्ध झालेलं आहे.