सौजन्य - सोशल मिडीया
आपल्या दिवसाची आरोग्यदायक पद्धतीने सुरुवात केल्याने मन व शरीर प्रसन्न राहते. आजकल लोक बाहेरून त्वचेची काळजी घेताना दिसतात पण तिचे आतून पोषण होणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी हेल्दी ड्रिंक पिल्याने शरीर आतून स्वछ राहण्यास मदत होते, आणि त्यामुळेच त्वचा सुंदर आणि टवटवीत राहते. त्वचेचे आरोग्य टिकवून राहण्यासाठी काही घरगुती पेये जी सोपी व उपायकारक ठरतात.
१) मधासोबत लिंबू पाणी
लिंबू आणि मधाचे मिश्रण त्वचेवर आश्चर्यकारकरीतीने कार्य करते. लिंबू मधील व्हिटॅमिन सी त्वचेतील निरोगी पेशी वाढवते, त्यामुळे त्वचा टवटवीत राहते. मधाचे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म छिद्रे बंद करतात तसेच अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करतात.
२) ग्रीन टी
ग्रीन टी हे सकाळचे आवश्यक ड्रिंक आहे ज्यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. रोज सकाळी ह्या ड्रिंक चे सेवन केल्याने त्वचेला मुरुम काढण्यास मदत होते.
३) नारळ पाणी
रोज सकाळी एक ग्लास नारळ पाणी पिल्यामुळे त्वचेची लवचिकता सुधारते आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते, आणि त्वचा हायड्रेटेड राहते. आणि हे पेय ताजेतवाने ठेवते.
४) आवळा ज्यूस
आवळा म्हणजेच भारतीय गूसबेरी हे त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेची मजबूती टिकवते आणि कोमेजलेल्या त्वचेपासून संरक्षण करण्यास मदत करते. हे एक अत्यंत आवश्यक सकाळचे पेय आहे जे त्वचेला हायड्रेट आणि चमकदार ठेवते.
५) काकडी आणि पालकचा रस
काकडी आणि पालक हे दोन्ही अँटिऑक्सिडंट्सने भरलेले असतात. काकडी मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, पालकमध्ये व्हिटॅमिन ई आणि सी भरपूर प्रमाणात असतात. काकडी आणि पालक त्वचेला हायड्रेट करते, ज्यामुळे त्वचा सुंदर होते व ग्लो करते. काकडीमध्ये असलेले कॅफीक आणि एस्कॉर्बिक ऍसिड पाणी टिकवून ठेवण्यास प्रतिबंध करते, त्वचेला सूज आणि फुगीर दिसण्यापासून वाचवते.






