फोटो सौजन्य - Social Media
हिवाळा सुरु झालाय. आता काही लोकांची अंघोळ टाळण्याची बहानी सुरु होतील. परंतु, अनेक लोकं गरम पाण्याने अंघोळ करतात. थंडीच्या वातावरणात गरम पाण्याने अंघोळ करणे अत्यंत सुखदायक आहे. परंतु, काही लोकांना अशा दिवसांमध्येही थंड पाण्याने अंघोळ करावे लागते. काही लोकांचे पथ्य असतात तर काही लोकांची परिस्थिती तशी असते. तरीही, या दिवसात स्वतःची काळजी करणे महत्वाचे असते. थंडीत थंड पाण्याने अंघोळ करणे म्हणजे आजारपणाच्या घरी जाऊन नियामंत्रणाची पत्रिका देणे. जर तुम्ही हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करत आहात तर फार मोठी चूक करत आहात. या दिवसात थंड पाण्याने अंघोळ केल्याने सर्दी, खोकला आणि ताप अशा काही समस्या उद्भवू शकतात. कधी तर याचा परिणाम इतका वाईट असतो कि हृदयविकाराचा धक्का येण्याची शक्यता असते.
हिवाळ्यात शरीराच्या तापमानाला सामान्य ठेवण्यासाठी शरीराला जास्त कष्ट करावे लागतात. विशेषतः ज्या व्यक्तींना आधीपासूनच हृदयविकारासंबंधित त्रास आहे, त्यांच्यासाठी हिवाळा हा ऋतू अधिक त्रासदायक ठरतो. संशोधनांनुसार, या काळात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण जवळपास ३१% ने वाढते. थंड हवामान, शरीरात होणारा तापमानातील फरक आणि रक्तप्रवाहातील बदल यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. त्यामुळे अशा परिस्थितीत शरीराला थंड पाण्याचा धक्का देणे म्हणजे हृदयविकाराच्या समस्येला आमंत्रण देण्यासारखे आहे.
थंड पाण्याने अंघोळ केल्यावर फक्त हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका नाही तर ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणावर वाढते. हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, थंड पाणी अचानक रक्तदाब वाढवते, ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो. या स्थितीत धमन्या आकुंचन पावतात. जर धमन्या आधीच चरबीमुळे आकुंचित असतील, तर थंड पाणी अंगावर पडल्यामुळे त्या अधिकच संकुचित होतात. यामुळे रक्तप्रवाह अडथळला जातो आणि हृदयाला किंवा मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. परिणामी, हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता वाढते.
हिवाळ्यात तापमान आधीच खूप कमी असते, त्यामुळे शरीराला अधिक थंड होण्यापासून वाचवणे गरजेचे असते. थंड पाण्याचा वापर केल्याने शरीराचा तापमान अचानक कमी होतो, ज्यामुळे शरीराला जास्त मेहनत करावी लागते आणि हृदयावर अतिरिक्त ताण येतो. विशेषतः वयोवृद्ध व्यक्ती, उच्च रक्तदाब असलेले रुग्ण, मधुमेह असणारे व्यक्ती आणि आधीच हृदयविकाराचा त्रास झालेल्या लोकांसाठी ही स्थिती अधिक धोकादायक ठरते.
थंड पाण्याने अंघोळ करण्याऐवजी, कोमट किंवा गरम पाण्याचा वापर करावा. यामुळे शरीराला उष्णता मिळते, रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि शरीराला आराम मिळतो. हिवाळ्यात अंघोळ करताना हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, शरीराला थंड हवामानाचा आणि थंड पाण्याचा एकत्रित धक्का बसू नये. थंड पाण्याने अंघोळ करणे केवळ शरीरासाठी त्रासदायक नाही, तर गंभीर आजारांना आमंत्रण देणारे ठरू शकते. म्हणूनच हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे हा आरोग्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे.