नवी दिल्ली : उत्तर भारतात तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) कायम असून, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये गेल्या तीन दिवसांत उष्णतेमुळे किमान 100 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशात 54 तर बिहारमध्ये (Bihar) अतिउष्ण हवामानामुळे 44 जणांचा मृत्यू झाला आहे. तर उष्माघाताने प्रकृती बिघडल्यामुळे 500 जणांना रूग्णालयात दाखल केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये 40 तामिळनाडू, मध्य प्रदेश, झारखंड, अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली आहे. उष्माघाताने रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उष्माघाताने आंध्र प्रदेश, तेलंगणा यांसारख्या विविध राज्यातील रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
झारखंडमध्ये सरकार चिंतित
झारखंडमधील सर्वच सरकारी आणि खासगी शाळांना आता २१ जूनपर्यंत (सुट्टी असणार आहे. उन्हाळ्यातील तीव्रता अद्यापही कमी होत नसल्याने झारखंड सरकारने तिसऱ्यांदा सुट्टी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाकडून यासंदर्भात आदेश जारी करण्यात आला आहे. शालेय शिक्षण तीव्र होण्याची शक्यता वर्तवली विभागाचे सचिव के. रवि कुमार यांनी म्हटले की, राज्यातील केजी ते इयत्ता ८ वी पर्यंतच्या शाळा २१ जूनपर्यंत बंदच राहणार आहेत. तर इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे शाळा आणि कॉलेजेस सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरू राहतील.