राजस्थानमध्ये भजनलाल सरकारचा मंत्रिमंडळा विस्तार; राज्यवर्धन राठोड, किरोरी लाल मीणा यांच्यासह १२ कॅबिनेट मंत्री; जाणून घ्या कोणाचा पत्ता कट अन् कोणाचा झाला समावेश

  Rajasthan Cabinet Expansion : राजस्थानमध्ये भाजपने 115 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या. राज्यातील 200 पैकी 199 जागांवर मतदान झाले. एका उमेदवाराच्या मृत्यूमुळे एका जागेवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली. सर्वांना आश्चर्याचा धक्का देत पक्षाने पहिल्यांदाच आमदार भजनलाल शर्मा यांना राजस्थानचे नवे मुख्यमंत्री बनवले आहे.

  भजनलाल सरकारमध्ये 17 मंत्र्यांनी घेतली शपथ

  राजस्थानमध्ये आज मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये 17 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. 12 कॅबिनेट मंत्री आणि 5 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. मात्र आज चित्र स्पष्ट झाले.

  भजनाल सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री

  राज्यवर्धन सिंह राठौर, गजेंद्र सिंह खिनवसर, डॉ. किरोरी लाल मीना, मदन दिलावर, जोगाराम पटेल, बाबुलाल खराडी, सुरेश सिंह रावत, अविनाश गेहलोत, जोराराम कुमावत, हेमंत मीना आणि कन्हैयालाल चौधरी यांना भजनाल सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. तर भजनलाल सरकारमध्ये संजय शर्मा, गौतम कुमार, झब्बर सिंग खरा, सुरेंद्र पाल सिंग टीटी, हिरालाल नागर यांना राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) बनवण्यात आले आहे.

  राजस्थानमध्ये भाजपने राज्यसभेच्या एका खासदारासह एकूण सात खासदारांना उमेदवारी दिली होती. तीन खासदार निवडणुकीत हरले आणि चार विजयी झाले. राजस्थानमध्ये निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचलेल्या खासदारांच्या यादीत किरोडीलाल मीना, बाबा बालकनाथ, राज्यवर्धन सिंह आणि दिया कुमारी ही नावे आहेत. पक्षाने दिया कुमारी यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे.