संग्रहित फोटो
दुर्वांग उर्फ पारस सुनिल मानकर (वय २१, रा. स्वारगेट), पारस किशोर गायकवाड (वय २१), अभि उर्फ अभिजीत संजय इंगळे (वय २२), साहील सागर शेलार (वय २४, रा. हडपसर), चंद्रशेखर सोमनाथ जावीर (वय २०, रा. कात्रज), सुरज रमेश दोरकर (वय २१, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याघटनेत गणेश संजु बिरादार (वय २५, रा. ससाणेनगर, हडपसर) याचा खून झाला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमित शेटे, अजय हंचाटे तसेच पोलिस अंमलदार निलेस देसाई, प्रतिक लाहिगुडे, अतुल पंधरकर तसेच त्यांच्या पथकाने केली आहे.
मुख्य आरोपी दुर्वांग मानकर आहे. तो सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर पुर्वीचे पाच गुन्हे नोंद आहेत. दरम्यान, दुर्वांग याचे एका मुलीशी प्रेम संबंध होते. तर, मयत गणेश बिरादार याचे दुर्वांग याच्या प्रेयसी असलेल्या मुलीच्या आईसोबत संबंध होते. गणेश हा विवाहित होता. दरम्यान, गणेश हा दुर्वांगच्या प्रेयसीला दुर्वांगसोबत रिलेशनमध्ये राहू नको असे म्हणत होता. तो स्वत:च्या प्रेयसीला म्हणजे दुर्वांगच्या प्रेयसीच्या आईलाही याबाबत सतत सांगत होता. यावरून गणेश व दुर्वांग यांच्यात वाद देखील झाले होते.
दुर्वांग गणेशला प्रेयसीला व तिच्या आईला काहीही न बोलण्याचे सांगत होता, तरीही तो सांगत होता. यावरून एक वेळा पुन्हा वाद झाला. गेल्या आठवड्यात गणेश हा काळेपडळमध्ये येऊन जात असताना आरोपींनी त्याला अडवून त्याचा सिमेंटचे गट्टे डोक्यात घालून निर्घुन खून केला. त्यानंतर आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरून त्यांना अटक केली.






