संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्ड (CBSE Board Exam) परीक्षेचा निकाल आज (दि.13) जाहीर झाला. यामध्ये देशातील 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या वर्षी मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे.

    नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्ड (CBSE Board Exam) परीक्षेचा निकाल आज (दि.13) जाहीर झाला. यामध्ये देशातील 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या वर्षी मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे.

    सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या बारावीचा निकाल जाहीर झाला. देशातील 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यावर्षी एकूण 91 टक्क्यांहून अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ही टक्केवारी मुलांच्या तुलनेत 6.40 टक्के अधिक आहे. यावर्षी सुमारे 39 लाख विद्यार्थ्यांनी CBSE बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती.

    सीबीएसईने यावर्षी देखील मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केलेली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत पासिंग पर्सेंटेज हे 0.65 टक्क्यांनी अधिक असल्याचं दिसत आहे.

    इथे पाहता येईल निकाल?

    सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही आपला निकाल पाहू शकता. cbse.nic.in, cbse.gov.in, cbsereults.nic.in आणि results.cbse.nic.in या वेबसाईट्सवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल.