भारताची सिंधू जल करारावर स्थगिती (फोटो- टीम नवराष्ट्र)
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदुर राबवून पाकिस्तानमधील शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण त्याला चोख उत्तर दिले. त्यानंतर दोन्ही देशांकडून शस्त्रसंधी करण्यात आली. भारत -पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला असला तरी भारताने घेतलेले अनेक निर्णय कायम ठेवले आहेत.
सीजफायर झाले असले तरी भारताने पाकिस्तानवर घातलेले निर्बंध अजूनही कायम ठेवले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानमधील सोशल मीडिया अकाउंट बंद करणे, सिंधू जल कराराला स्थगिती देणे, व्यापार बंद करणे, वाघा बॉर्डर बंद ठेवणे अशा अनेक निर्णयांचा समावेश आहे.
वाघा-अटारी बॉर्डर बंद
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने वाघा बॉर्डर बंद केली आहे. मात्र अजूनही सीमा सुरु करण्यात आलेली नाही. भारतानेआपला हा धोरणात्मक निर्णय कायम ठेवला आहे.
पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश
भारताने पहलगाम हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानी नागरिक आणि दूतावास अधिकाऱयांना भारत सोडण्याचे निर्देश दिले आहे. केंद्र सरकारने तो निर्णय कायम ठेवला आहे.
सिंधू जल कराराला स्थगिती
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. मात्र आता दोन्ही देशांमध्ये सिजफायरचा निर्णय झाला असला तरी भारताने हा करार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान मोदींचे आक्रमक विधान
भारतामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. युद्धविराम लागल्यानंतर देखील पाकिस्तानकडून तीन तासांमध्ये याचे उल्लंघन करण्यात आले. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यामध्ये चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ९ मे रोजी फोनवरून संवाद साधत दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याची माहिती सांगितली जाते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
“जर तिकडून गोळी चालवली तर इकडून गोळा…; युद्धाच्या तणावपूर्ण वातावरणात पंतप्रधान मोदींचे आक्रमक विधान
मीडिया रिपोर्टनुसार, या संवादावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेडी व्हान्स यांच्यासमोर आक्रमक भूमिका घेत ठणकावून भूमिका घेतली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, “पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आल्यास भारत देखील जोरदार प्रत्युत्तर देईल पाकिस्तानच्या कोणत्याही चुकीच्या कृतीला भारताचं प्रत्युत्तर अधिक कठोर असेल, असं पंतप्रधान मोदीनी जेडी व्हान्स यांना सांगितले.
तणावपूर्ण परिस्थिती निवळल्यानंतर आता दिल्लीमध्ये बैठकीचा वेग वाढला आहे. राजकीय हालचालींना वेग आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जात आहे. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह तिन्ही दलाचे प्रमुख मोदींच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.