नवी दिल्ली : एकीकडे केरळमध्ये निपाह व्हायरसची(Nipah Kerala Update) प्रकरणे आणखी वाढू लागली आहेत. राज्यात आतापर्यंत या संसर्गाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. यासह आता आणखी एका प्रकरणाची पुष्टी झाली आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयाने सांगितले आहे की, केरळमधील कोझिकोड येथील रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवलेल्या ३९ वर्षीय व्यक्तीमध्ये निपाह विषाणूच्या आणखी एका प्रकरणाची पुष्टी झाली आहे.
आता चिंताजनक बाब म्हणजे 700 हून अधिक लोक संक्रमित लोकांच्या संपर्कात आले आहेत. यापैकी 77 लोक उच्च जोखमीच्या श्रेणीत आहेत. सध्या या लोकांना त्यांच्या घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
याआधी कोझिकोड जिल्ह्यात या विषाणूची लागण झालेल्या दोघांचा मृत्यू झाला होता. कन्नूर, वायनाड आणि मलप्पुरम या आणखी तीन जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यातील 9 ग्रामपंचायतीतील 58 प्रभाग कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत.
या भागात जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेतच उघडण्यास परवानगी आहे. या वरती, कोझिकोडच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या भागातील सर्व शैक्षणिक संस्था, अंगणवाडी केंद्र, बँका आणि सरकारी संस्था तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
In view of Nipah cases in Kerala, Karnataka Govt issued a circular and has advised the general public to avoid unnecessary travel to affected areas of Kerala; intensify surveillance in the bordering districts to Kerala ( Kodagu, Dakshin Kannada, Chamrajanagara & Mysore) and at… pic.twitter.com/41whQrTgx2 — ANI (@ANI) September 15, 2023
केरळमधील निपाहच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटक सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे आणि लोकांना केरळच्या प्रभावित भागात अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. अशी माहिती कर्नाटक आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.






