अभिनेत्री प्रियांका चोप्राला आवडतो गावरान पद्धतीने बनवला झणझणीत ठेचा
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या अभिनयामुळेच नाहीतर फॅशन आणि ग्लॅमरमुळे सुद्धा फेमस आहे. सोशल मीडियावर ती फिटनेस, ग्लो आणि इंटरनॅशनल लाइफस्टाइल याबद्दल काहींना काही शेअर करत असते. तिला भारतीय मराठमोळे पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. बऱ्याचदा अभिनेत्रींचे नाव ऐकल्यानंतर असे वाटते की त्यांना फक्त महागड्या हॉटेलमधील परदेशी पदार्थ खायला आवडतात, पण असे नाही. अभिनेत्रींना भारतीय मराठमोळे पदार्थ खायला खूप जास्त आवडते. त्यातील प्रियांकाच्या अतिशय आवडीचा पदार्थ म्हणजे झणझणीत गावरान ठेचा. झणझणीत ठेचा केवळ जिभेची चव वाढवत नाही तर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. जेवणाच्या ताटात जर हिरवी मिरची किंवा लसूणपासून बनवलेला ठेचा असेल तर चार घास जास्त जातात. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात आवडीने ठेचा बनवला जातो. ठेचा भाकरी किंवा चपातीसोबत आवडीने खाल्ला जातो. चला तर जाणून घेऊया ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






