Delhi Building Collapse: Big Breaking!!! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
पोलिस अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. बचाव पथकाकडून ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी स्थानिक लोकांची पण मोठी गर्दी जमली असून सगळे लोक बचाव पथकाला मदत करत आहेत. हाताने ढिगारा हटवून आत कोणी अडकलंय का हे बघितलं जात आहे.
या दुर्घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अजून जास्त टीमला पाचारण करण्यात आलं आहे.सत्य निकेतन हा परिसर दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसजवळ आहे. त्यामुळे इथे बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांचे हॉस्टेल आणि पीजी आहेत. जी इमारत कोसळली ती जुनी होती की नव्याने बांधलेली होती, याबद्दल अजून माहिती समोर आलेली नाही.
या दुर्घटनेनंतर राजकारण पण सुरू झालं आहे. काँग्रेसने या घटनेवरून सरकारवर संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करून चिंता व्यक्त केली आहे.NSUI ने म्हटलं आहे की, “दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसजवळ सत्य निकेतनमध्ये इमारत कोसळल्याची बातमी खूपच चिंताजनक आहे.
ढिगाऱ्याखाली दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी अडकल्याची माहिती येत आहे.”ते पुढे म्हणाले की, “विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. दिल्ली विद्यापीठ प्रशासनाने आणि सरकारने ताबडतोब युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करावं. प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित बाहेर काढावं. आणि या घटनेची निष्पक्ष चौकशी करून ज्यांची चूक आहे त्यांच्यावर कारवाई करावी. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणं खपवून घेतलं जाणार नाही.”
दिल्ली विश्वविद्यालय के साउथ कैंपस के पास सत्य निकेतन में हुई यह घटना बेहद चिंताजनक है। DU के छात्रों के मलबे में दबे होने की खबरें सामने आ रही हैं। केंद्र में BJP की सरकार है, दिल्ली में BJP की सरकार है और MCD में भी BJP का मेयर है। जब सत्ता और प्रशासन की जिम्मेदारी हर स्तर… pic.twitter.com/5bjZDOaJ1T — NSUI (@nsui) September 6, 2026
अजून या दुर्घटनेचं नेमकं कारण कळलेलं नाही. पण प्राथमिक माहितीनुसार इमारत खूप जुनी असावी किंवा तिच्या बांधकामात काहीतरी गडबड असावी असा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत होता, त्यामुळे इमारतीच्या पायाला पाणी लागून ती कमकुवत झाली असावी.परंतू ही माहिती चौकशीनंतरच समोर येईल.
सध्या सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढणं. संपूर्ण देशाचं लक्ष आता दिल्लीतल्या या बचावकार्याकडे लागलं आहे. देवाकडे प्रार्थना आहे की सगळे विद्यार्थी सुरक्षित बाहेर येतील.या घटनेमुळे दिल्लीतील जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष दिलं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती, असंही काही लोक म्हणत आहेत.






