राजस्थानच्या भरतपूरमध्ये जमिनीच्या वादातून रक्तरंजित थरारा पाहायला मिळाला. एका व्यक्तीचा ट्रॅक्टरने चिरडून निर्घृण खून करण्यात आला आहे. जमिनीवर पडलेल्या माणसावर एक-दोन नव्हे तर आठ वेळा ट्रॅक्टर चालवण्यात आला. यावेळी त्याच्े कुटुंबीय आरडाओरड करत राहिले तर गावातील इतर लोक व्हिडिओ बनवत राहिले. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
[read_also content=”अभिनेता राजकुमार राववर मोठी जबाबदारी, भारतीय निवडणूक आयोगाकडून नॅशनल आयकॅान म्हणून नियुक्ती होणार! https://www.navarashtra.com/movies/election-commission-of-india-to-appoint-actor-rajkummar-rao-as-its-national-icon-nrps-473782.html”]
सदर पोलिस ठाण्याचे एसएचओ जयप्रकाश परमार यांनी सांगितले की, अड्डा गावातील बहादूर गुर्जर आणि अतारसिंग गुर्जर यांच्यात जमिनीवरून बराच काळ वाद सुरू आहे. या वादावरून बुधवारी सकाळी आठच्या सुमारास दोन्ही पक्ष पुन्हा आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लाठ्या-काठ्या आणि दगडफेक केली. यामध्ये दोन्ही बाजूच्या महिलांचाही समावेश होता.
भाडंणा दरम्यान अतार सिंगचा मुलगा निरपत गुर्जर (35) जमिनीवर पडला. तेव्हा एका तरुणाने निरपतवर ट्रॅक्टर चालवला. थांबवूनही आरोपी ट्रॅक्टर चालकाने न थांबता जमिनीवर पडलेल्या निरपतवर ट्रॅक्टरचे चाक 8 वेळा चालवले. ट्रॅक्टरने चिरडल्याने निरपतचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. एसएचओ म्हणाले की, गावकऱ्यांच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. मृत निरपत गुर्जर यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी बयाना सीएचसी येथे पाठवण्यात आला आहे.
या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मारामारीदरम्यान गोळीबाराचा आवाजही ऐकू आला. आरोपी ट्रॅक्टर चालकाची ओळख पटवली जात आहे. 21 ऑक्टोबरलाही बहादूर आणि अतारसिंग गुर्जर पक्षांमध्ये मारामारी झाली होती. यावेळी बहादूर व त्याचा लहान भाऊ जनक गंभीर जखमी झाले. या घटनेबाबत बहादूरचा मुलगा दिनेश याने दुसऱ्या पक्षाचे अतरसिंग व त्यांचे मुलगे निरपत, विनोद, दामोदर व नातेवाईक ब्रजराज यांच्याविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.