संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Crime Rate Increases) वाढ होताना दिसत आहे. त्यात आता हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील बहादूरगडमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.

    झज्जर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Crime Rate Increases) वाढ होताना दिसत आहे. त्यात आता हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील बहादूरगडमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका बापाने आपल्या दोन लहान मुलांना फासावर लटकवले आणि नंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली.

    करंबीर (वय 37) असे या नराधम बापाचे नाव आहे. त्याने त्याचा 11 वर्षांचा मुलगा तनुज आणि 13 वर्षांची मुलगी मुस्कान यांना फाशी देऊन हत्या केली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, करमबीर दिल्लीत बस चालवत असे. रात्री त्याचे पत्नीशी भांडण झाले. ज्यामध्ये करमबीरने आधी पत्नीला मारहाण केली. करमबीरची मानसिक स्थिती पाहून पत्नी आपल्या मेहुण्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यासाठी गेली. नेमकं याचदरम्यान, करमबीरने पहिलं मुलाला आणि नंतर मुलीला फासावर लटकवले. यात ते दोघे जागीच मृत्यू पावले.

    आपली दोन्ही मुले मृत झाल्याचे पाहून त्यानंतर करमबीरने स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. त्याची पत्नी आणि करंबीरच्या भावाचे कुटुंब घरी परतले तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही बाब तत्काळ पोलिसांना कळवण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण केले.