दिल्लीत आपला धक्का! या पक्षाला मिळतंय बहुमत, एक्झिट पोलचे अंदाज चक्रावून टाकणारे
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज मतदान झालं. संपूर्ण देशाचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मात्र त्याआधी एक्झिट पोलच्या अंदाजांनी संपूर्ण देशाला आश्चर्चचकित केलं आहे. कारण गेली १० सत्तेत असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला मोठा धक्का बसताना दिसत आहे. तर भाजप दिल्लीत सत्ता स्थापन करू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 6 एक्झिट पोलच्या अंदाजांमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे.
Delhi Election Exit Poll
मॅट्िझच्या पोल्सनुसार दिल्लीत भाजपाला 35 ते 40 जागा. कॉंग्रेसला 1 ते 0 जागा. तर आपला 32 ते 36 जागा मिळण्याची शक्यता आहे. चाणक्यच्या पोलनुसार, भाजपाला 39 ते 44 जागा, कॉंग्रेसला 2 ते 3 जागा. आम आदमी पार्टीला 25 ते 28 जागा मिळताना दिसत आहेत. कॉंग्रेससाठी हे एक्झिट पोल्स नक्कीच धक्का देणारे असणार आहेत.
आम आदमी पार्टीलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कॉंग्रेसकडून या निवडणुकीमध्ये मोठे दावे करण्यात आले. मात्र, एक्झिट पोल्सचे येणारे आकडे धक्कादायक आहेत. भाजप दिल्लीत मोठी मुसंडी मारताना दिसत आहेत. भाजपाकडून जोरदार प्रचार करण्यात आला. आरोप प्रत्यारोपांचे सत्र या निवडणुकीमध्ये जोरदार रंगले होते. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये राहण्याच शक्यता एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार दिसत आहे. प्रत्यक्षात दिल्ली विधानसभेचा निकाल हा 8 तारखेला लागणार आहे. मात्र, सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल.
दिल्लीत मतदानाची टक्केवारी घसरली? 5 पर्यंत केवळ 57 टक्के मतदान
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान झाले आहे. दिल्ली विधांसाभहकीय 70 जागांसाठी आज मतदान पार पडले. 70 जागांचा निकाल 8 तारखेला येणार आहे. त्यावेळीच दिल्लीत कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. दिल्लीत 70 जागांसाठी 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
दिल्लीत 17,766 मतदान केंद्रावर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दिल्लीमध्ये सुमारे 1 कोटी 56 लाख मतदार मतदान करण्यास पात्र असल्याचे समजते आहे. त्यामुळे 8 तारखेला मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे ते स्पष्ट होणार आहे. मात्र 2020 पेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचे म्हटले जात आहे. काही जागांवर अजूनही मतदान सुरू आहे. त्यामुळे अंतिम टक्केवारी येणे बाकी आहे. आम आदमी पक्ष, भाजप , कॉँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्ष आपण केलेल्या कामाच्या जोरावर तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. तर कॉँग्रेस आणि भाजप सत्ता परिवर्तन करण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत.