Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केजरीवालांना घरचा आहेर; खा. हरभजन सिंग अयोध्येमध्ये राहणार उपस्थित, म्हणाले, कोणाला अडचण असेल तर…

22 तारखेला प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून यासाठी अनेक क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले आहे. क्रिकेट विश्वातून अनेक खेळाडू या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आप खासदार व माजी क्रिकेटर हरभजन सिंग याचे देखील नाव आहे. सध्या हरभजन याने राम मंदिर उद्घाटन सोहळ्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 20, 2024 | 05:13 PM
केजरीवालांना घरचा आहेर; खा. हरभजन सिंग अयोध्येमध्ये राहणार उपस्थित, म्हणाले, कोणाला अडचण असेल तर…
Follow Us
Close
Follow Us:

अयोध्या : प्रभू श्री राम मंदिर उद्घाटन (Ram Mandir Inauguration) सोहळा अवघ्या काही क्षणांवर येऊन ठेपला आहे. अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर हा सोहळा अयोध्येमध्ये (Ayodhya) पार पडणार आहे. यामुळे देशभरामध्ये जल्लोषपूर्ण वातावरण असून राम भक्तांमध्ये उत्साह दिसून येत आहे. 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून यासाठी अनेक क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले आहे. क्रिकेट विश्वातून अनेक खेळाडू या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आप खासदार व माजी क्रिकेटर हरभजन सिंग (Harbhajan Singh) याचे देखील नाव आहे. सध्या हरभजन याने राम मंदिर उद्घाटन सोहळ्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.

राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी क्रिकेटविश्वातील महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा अशा अनेक खेळाडूंना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांनी अद्याप सोहळ्याला उपस्थिती लावण्याबाबत स्पष्टता दिलेली नाही. मात्र हरभजन सिंग याने राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला येणार असल्याचे स्पष्ट केले. ‘आमचं नशिब इतकं चांगलं आहे की अयोध्येत प्रभू रामचंद्रांचं मंदिर बनत आहे. आम्हाला तिथे जाऊन प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. प्रभू रामांवर माझी आस्था आहे आणि तेथे कोण जाणार आणि कोण नाही जाणार यामुळे काही फरक पडत नाही.’ असे स्पष्ट मत हरभजन सिंगने व्यक्त केले. मात्र त्याच्या या वक्तव्यामुळे चर्चेंना उधाण आले आहे.

आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र आपचे खासदार हरभजन सिंग यांनी कोणी जाणार नाही यामुळे मला फरक पडणार नसल्याचे सांगितले. पुढे ते म्हणाले, ‘मला काहीच फरक पडत नाही की कोणते राजकीय पक्ष त्या कार्यक्रमाला जाणार आहे. मी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला नक्की जाणार आहे. जर कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी जाऊ नये.’ असे हरभजन सिंग यांनी आपला घराचा आहेर देत राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावणार असल्याचे जाहीर केले.

 

 

Web Title: Aap mp ex cricketer harbhajan singh ram mandir pranapratistha ceremony replies arvind kejriwal nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2024 | 05:13 PM

Topics:  

  • AAP
  • Arvind kejriwal
  • ayodhya
  • MS. Dhoni
  • Ram Mandir Inauguration
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
1

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
2

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
3

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास
4

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.