मथुरा: अयोध्येतील राम मंदिराची (Ram Temple) उभारणी एका बाजूला जलद गतीनं होत असतानाच, दुसरीकडे काशी विश्वनाथाच्या कॉरिडॉरचं कामही पूर्ण झालं आहे. काशी विश्वेवराप्रमाणंच आता तिसरे शक्ती स्थान असलेल्या मथुरेच्या (Mathura) बांके बिहारी मंदिराचाही (Banke Bihari Temple) कायापालट करण्यात येणार आहे. इथंही भव्य कॉरिडॉर बनवण्याच्या हालाचालींना वेग आला आहे. त्याची तयारीही पूर्ण झाल्याची माहिती आहे. या कॉरिडॉरच्या सर्वेक्षणाचं कामही पूर्ण करण्यात आलंय. सुमारे ५ एकर परिसरात बांके बिहारी मंदिराचा हा भव्य कॉरिडॉर उभा करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कॉरिडॉरसाठी १६ हजार कोटी खर्च करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी अलाहाबाद हायकोर्टात हा कॉरिडॉर उभारण्यात येणार असल्याचं उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. हा कॉरिडॉर मंदिर आणि यमुना नदीला जोडणार असल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्यानं दिली होती. काशी विश्वनाथ कॉरिडॉरप्रमाणचं हा ही कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे.
कसं होणार बांके बिहारीचं नवं मंदिर
१. प्रस्तावित प्लॅननुसार, कॉरिडॉरमधून मंदिरापर्यंत जाण्यासाठी ३ रस्ते उभारण्यात येणार आहेत. जगल घाट, विद्यापीठ चोक आणि जदौन पार्किंगमधून मंदिरापर्यंत जाता येणार आहे.
२. हा कॉरिडॉर दोन मजली उभारण्यात येणार आहे. या कॉरिडॉरमधून भाविक जसजसं पुढे सरकतील तसतसं त्यांना भव्य मंदिर परिसर आणि मंदिर दिसणार आहे.