तीनशे साडेतीनशे वर्षाचा इतिहास लाभलेला विजयदुर्ग किल्ल्याची बुरुजं लाटांच्या माऱ्यामुळे ढासळली गेली. महाराजांचा वारसा जपणं हीच खरी त्यांना दिलेली आदरांजली आहे, त्यामुळे किल्ल्याच्या तटबंदीच्या दुरुस्तीच्या प्रस्तावामुळे शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केलं.
किल्याच्या संवर्धनासाठी आणि तटबंदीच्या दुरुस्तीसाठी केंद्र सराकारने विकासनिधीला मंजुरी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेला ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला संवर्धनासाठी केंद्र सरकारचं लक्ष वेधलं आहे. किल्ल्याच्या दर्या बुरुजाच्या तटबंदीच्या भिंतीच्या तुटलेल्या भागाच्या दुरुस्तीसाठी भारत सरकारच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने 8 कोटी 60 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. राज्याचे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
दर्या बुरुजाच्या तटबंदीचा काही भाग कमकुवत झाला होता. ही ऐतिहासिक रचना जतन करण्यासाठी आता तांत्रिकदृष्ट्या शास्त्रीय पद्धतीने पुनर्संचयितीचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामासाठी एमडब्ल्यू (संवर्धन) आरसीपीअंतर्गत मुंबई मंडळ व विजयदुर्ग उप मंडळामार्फत काम राबवले जाणार आहे.






