न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा (फोटो- सोशल मीडिया)
न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर
बीसीसीआयने जाहीर केला संघ
शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरची एंट्री
Indian Cricket Team: लवकरच भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यामध्ये भारत न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्ध संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आला आहे.
🚨 News 🚨 India’s squad for @IDFCFIRSTBank ODI series against New Zealand announced. Details ▶️ https://t.co/Qpn22XBAPq#TeamIndia | #INDvNZ pic.twitter.com/8Qp2WXPS5P — BCCI (@BCCI) January 3, 2026
न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मोहम्मद सिराज देखील या मालिकेत खेळताना दिसणार आहे. साऊथ आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला नव्हता. शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराजचा या संघात प्रवेश करण्यात आला आहे. तर तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, ध्रुव जुरेल यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही.
विकेट किपर म्हणून ऋषभ पंत सोबत केएल राहुल याला देखील स्थान देण्यात आले आहे. संजू सॅमसनला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला देखील संघात स्थान देण्यात आलेले नाही. 11 ते 18 जानेवारी दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ:
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार)*, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक, अरिश कुमार रेड्डी), अरविंद कुमार, यष्टिरक्षक.






