आरोप प्रत्यारोपांनंतर अखिलेश यादवांनी आयोगाला थेट पुरावेच दाखवले
याशिवाय समाजवादी पक्षाने निवडणूक आयुक्तांना एक इमेल पाठवत उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मतदारांची मते कापली जात असल्याची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीसोबत त्यांनी एक प्रतिज्ञापत्रही पाठवले आहे. राहुल गांधींच्या आरोपांनंतर समाजवादी पक्षानेही निवडणूक आयोगावर टीका करत आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय अखिलेश यादव यांनी त्यांच्या ट्विटर एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. “समाजवादी पक्षने दिलेले प्रतिज्ञापत्र आम्हाला मिळाले नसल्याचा आरोप निवडणूक आयोगाने केला आहे. पण त्यांनी आमच्या प्रतिज्ञापत्राच्या पावतीचा पुरावा म्हणून दिलेली त्यांच्या कार्यालयाची पावतीही पाहावी, आमची मागणी आहे की, निवडणूक आयोगाने आम्हाला पाठवलेली डिजिटल पावती बरोबर असल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे, अन्यथा ‘निवडणूक आयोगा’सोबत ‘डिजिटल इंडिया’ देखील संशयाच्या भोवऱ्यात येईल.” त्याचवेळी त्यांनी पोस्टमध्ये आयोगाकडून मिळालेल्या काही पोचपावत्यांच्या स्क्रिनशॉटही जोडला आहे.
यासोबतच अखिलेश म्हणाले की, ‘आमची मागणी अशी आहे की जातीच्या आधारावर बीएलओ नियुक्त करू नका, उत्तर प्रदेशचा डेटा मिळवा, ज्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत निवडणूक घेतली जाते त्या अधिकाऱ्यामध्ये एकही पीडीए अधिकारी असेल तर मला सांगा. भाजप सरकार आल्यापासून, तक्रारीवरून एकाही अधिकाऱ्याला काढून टाकले गेले असेल तर मला सांगा, याचा अर्थ निवडणूक आयोग भाजपचे जास्त ऐकतो.
“जर मते मिळवण्याची प्रक्रिया असेल तर मते रद्द करण्याची देखील प्रक्रिया आहे, आमची मागणी अशी आहे की एका जिल्हा दंडाधिकाऱ्याला निलंबित करा आणि संपूर्ण देशात एकही मत रद्द होणार नाही. जर २०१९, २२, २४ मध्ये एकाही अधिकाऱ्याला काढून टाकण्यात आले असेल तर मला सांगा. अखिलेश म्हणाले की त्यांनी जाणूनबुजून मागासवर्गीयांची मते कापली आहेत, बिंद, मौर्य, पाल, राठोड समुदाय हे सर्व यामध्ये समाविष्ट आहेत आणि ते दाखवतात की त्यांना मागासवर्गीयांची मते मिळत आहेत. त्यांनी मागासवर्गीयांची मते यादीतून कापली आणि तुम्ही निवडणूक जिंकता. सत्य हे आहे की त्यांची मते वगळली जात आहेत.
यापूर्वी रविवारी अखिलेश म्हणाले होते की, “उत्तर प्रदेशात सपाने दिलेले प्रतिज्ञापत्र मिळाले नसल्याचा दावा करणाऱ्या आयोगाने त्या प्रतिज्ञापत्रांच्या पावत्या पहाव्यात. ‘उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने दिलेले शपथपत्र आम्हाला मिळालेले नाही असे म्हणणाऱ्या निवडणूक आयोगाने आमच्या शपथपत्रांच्या पावतीचा पुरावा म्हणून दिलेल्या त्यांच्या कार्यालयाच्या पावत्या पहाव्यात.’ यादव यांनी यापूर्वी ‘X’ वर दुसऱ्या पोस्टमद्ये , सपाने आयोगाला ‘मत लुटण्याचे’ १८ हजार शपथपत्र दिले होते परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा दावा केला होता.
जो चुनाव आयोग ये कह रहा है कि हमें यूपी में समाजवादी पार्टी द्वारा दिये गये ऐफ़िडेविट नहीं मिले हैं, वो हमारे शपथपत्रों की प्राप्ति के प्रमाण स्वरूप दी गयी अपने कार्यालय की पावती को देख ले। इस बार हम मांग करते हैं कि चुनाव आयोग शपथपत्र दे कि ये जो डिजिटल रसीद हमको भेजी गयी है वो… pic.twitter.com/9A4njvF9Tw — Akhilesh Yadav (@yadavakhilesh) August 17, 2025
चिट्ठा लंबा होता जा रहा है जिनकी करतूतों-कारनामों का
उनका जवाब भी न आया अब तक हमारे ‘हलफ़नामों’ का pic.twitter.com/QSFCEHhU5j — Akhilesh Yadav (@yadavakhilesh) August 17, 2025






