अहमदाबाद अपघातापूर्वी कॉकपिटमध्ये नक्की काय घडलं होतं? ब्लॅक बॉक्समधून धक्कादायक माहिती समोर
अहमदाबाद विमान अपघातात जवळपास ३०० प्रवासी आणि नागरिकांचा मृत्यू झाला. या भयानक घटनेनंतर इतकी मोठी चूक कशी झाली याची चौकशी सुरू आहे. शिवाय अपघात घडण्याआधी विमानाच्या कॉकपीटमध्ये नक्की काय घडलं. याचाही तपास केला जात असून आणि दोन्ही ब्लॅक बॉक्समधून (CVR आणि FDR) महत्त्वाचा डेटा यशस्वीरित्या मिळवण्यात आला आहे. अपघाताची निश्चित कारणे शोधण्यासाठी आता तांत्रिक तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तपासणी केली जात आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली आहे.
UP Accident: स्लीपर बस रेलिंगला धडकली अन्….; भीषण अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू, ५० गंभीर जखमी
१३ जून २०२५ रोजी झालेल्या या विमान अपघातानंतर लगेचच, विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ने आंतरराष्ट्रीय मानकांनुसार एक तज्ज्ञ पथक नेमलं आहे. या पथकाचे नेतृत्व AAIB चे महासंचालक करतात. या पथकात विमान वाहतूक वैद्यकीय तज्ज्ञ, हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) अधिकारी आणि यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाचे (NTSB) प्रतिनिधी देखील समाविष्ट आहेत, कारण विमान अमेरिकेत बनवलं गेलं होतं. तपासाचे प्रत्येक पाऊल भारताच्या कायद्यांनुसार आणि आंतरराष्ट्रीय नियमांनुसार पारदर्शकतेने उचललं जात आहे.
ब्लॅक बॉक्स हस्तगत
१३ जून रोजी अपघातस्थळी असलेल्या इमारतीच्या छतावरून पहिला ब्लॅक बॉक्स, म्हणजेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) सापडला.
१६ जून रोजी विमानाच्या ढिगाऱ्यातून दुसरा ब्लॅक बॉक्स, म्हणजेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) काढण्यात आला.
दोन्ही ब्लॅक बॉक्स अहमदाबादमध्ये कडक पोलिस सुरक्षा आणि सीसीटीव्ही देखरेखीखाली सुरक्षित ठेवण्यात आले होते.
२४ जून २०२५ रोजी, दोन्ही ब्लॅक बॉक्स भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाद्वारे अहमदाबादहून दिल्लीला आणण्यात आले.
पहिला ब्लॅक बॉक्स दुपारी २ वाजता AAIB लॅबमध्ये पोहोचला, तर दुसरा बॉक्स AAIB टीमने संध्याकाळी ५:१५ वाजता पोहोचवला.
डेटा डाउनलोड आणि विश्लेषण प्रक्रिया
२४ जून रोजी संध्याकाळपासून, AAIB आणि NTSB च्या तांत्रिक तज्ञांनी ब्लॅक बॉक्समधून डेटा काढण्याची प्रक्रिया सुरू केली. यानंतर, २५ जून रोजी मेमरी मॉड्यूलमधून डेटा यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला. आता CVR आणि FDR या दोन्ही रेकॉर्डर्सच्या डेटाचे बारकाईने विश्लेषण केले जात आहे. अपघातापूर्वी विमानात कोणत्या हालचाली सुरू होत्या आणि तांत्रिक किंवा मानवी चूक हे कारण होते का हे शोधणे हा तपासाचा उद्देश आहे.